World Cup 2023: सध्या भारतात विश्वचषक 2023 खेळवला जात आहे. विश्वचषकात आतापर्यंत सर्वच संघांनी 5 सामन्याच्या वर सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत.
विश्वचषकाच्या मध्यंतरी ऑस्ट्रोलीयाला मोठा धक्का..

ऑस्ट्रेलियाचे ८ गुण असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. पण विश्वचषकाच्या मध्यंतरी संघाला धक्का बसला. संघाचा अनुभवी अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) मायदेशी परतत आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो विश्वचषकाच्या मध्यावर मायदेशी जाणार आहे. यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल जखमी झाला होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध आहे. या सामन्यासाठी ती अॅलेक्स कॅरी, मार्कस स्टॉइनिस किंवा शॉन अॅबॉट यापैकी एकाला संधी देऊ शकते.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शबद्दल माहिती दिली. आयसीसीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार मार्शच्या (Mitchell Marsh) पुनरागमनाबाबत कोणतेही अपडेट मिळालेले नाही. वैयक्तिक कारणास्तव तो ऑस्ट्रेलियाला परतत आहे. मार्शने या विश्वचषकात आतापर्यंत विकेट घेण्यासोबत 225 धावा केल्या आहेत. लखनौमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर लगेचच त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. त्याने 121 धावा केल्या होत्या. मार्श (Mitchell Marsh) हा ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा भाग असून उपांत्य फेरीपूर्वी त्याचे बाहेर पडणे संघासाठी घातक ठरू शकते.
World Cup 2023 मध्ये ऑस्ट्रोलियाची कामगिरी
डेव्हिड वॉर्नरने (David warner) या विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 6 सामन्यात 413 धावा केल्या आहेत. वॉर्नर या विश्वचषकात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, अॅडम झाम्पाने प्रभावी कामगिरी केली आहे. झाम्पाने 6 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो सध्या संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडपाठोपाठ अफगाणिस्तानला पराभूत करावे लागेल. यानंतर त्याचा सामना बांगलादेशशी होणार आहे.
हेही वाचा: