भारतात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने आपले पहिले तीनही सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेत विरोधी संघांवर एक धाक निर्माण केला आहे. या विजयाच्या हॅट्रिकमुळे भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने विरोधी संघाचे मनसुबे उधळून लावणारे गोलंदाज आणि मोक्याच्या क्षणी धडाकेबाज खिळे करणारे फलंदाज हे भारतीय संघाच्या विजयाचे हिरो आहेत.
यंदाच्या विश्वचषकात भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनल पर्यंत मजल मारण्यासाठी भारतीय संघाला अजून किती सामने जिंकायचे आहेत याची माहिती पुढील प्रमाणे घेऊयात. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तीन विजयासह भारताचे सहा गुण झाले आहेत. सदरच्या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले आहेत त्यात प्रत्येक संघाला एकमेकाविरुद्ध नऊ सामने खेळता येणार आहेत.
विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला जिंकावे लागतील एवढे सामने.
सेमी फायनलपर्यंत मजल मारण्यासाठी भारतीय संघाला एकूण सात सामने जिंकायचे आहेत भारताने यापूर्वीच तीन सामने जिंकलेत. भारताला आणखीन चार सामने जिंकण्याची गरज आहे.
भारतीय संघाने सहा सामने जिंकले तरी तो टॉप फॉर मध्ये येऊ शकतो. मागील विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी पाच सामने जिंकलेल्या संघदेखील सेमी फायनलमध्ये पोहोचला होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघाचे प्रत्येकी 11-11 गुण झाले होते, मात्र नेट रन रेटच्या हिशोबानुसार न्यूझीलंडने सेमी फायनल मध्ये धडक मारली होती.
भारताचे पुढील सामने बांगलादेश, इंग्लंड, साउथ आफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड आणि न्यूझीलंड या संघासोबत होणार आहेत. मागील आकडेवारीनुसार, न्यूझीलंड वगळता इतर संघासोबत होणारे सामने भारताला जड जाणार नाहीत. न्युझीलँड असा एकमेव संघ आहे जो की भारताला प्रत्येक वेळेस विश्वचषकात जड गेलेला आहे. न्यूझीलंड विरुद्धचा पेपर सोपा गेला तर भारताला विश्वचषक जिंकणापासून कोणताच संघ रोखू शकणार नाही.
रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर हे सर्वच खेळाडू तुफान फार्मात आहेत. बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर आश्विन हे आपल्या भेदक गोलंदाजीच्या जीवावर विरोधी संघाचे मनसुबे उधळून लावत आहेत
यंदाचा विश्वचषक हा भारतात होत असल्यामुळे भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याची संधी चालून आली आहे. 1983 साली भारताने पहिल्यांदा कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्व चषक जिंकला होता. पुन्हा 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 28 वर्षानंतर विश्वचषक जिंकला होता. 2023 चा विश्वचषक भारत जिंकल्यास तिसऱ्यांदा या विश्वचषकावर नाव कोरेल.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी.