World cup 2023: दोन संघाच्या कर्णधारांना लागले दुखापतीचे ग्रहण;श्रीलंका-न्यूझीलंड संघ अडचणीत..

World cup 2023

World cup 2023 : 2023 चा विश्वचषक जिंकण्यासाठी दहा संघाचे कर्णधार मोठ्या प्लानिंग नुसार स्पर्धेत उतरले आहेत.मात्र काही संघांना त्यांच्या कर्णधारानेच मोठी अडचण करून टाकली आहे. त्यांना ऐन स्पर्धेच्या वेळेस दुखापतीचं ग्रहण लागले आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या इव्हेटंमध्ये दुखापतीचे ग्रहण लागणे. हे त्या-त्या संघाला धोकादायक ठरू शकते.

World cup 2023: श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका संपूर्ण विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर

दुखापतीमुळे सुरुवातीला श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका हा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता नव्याने भर पडली आहे ती म्हणजे किवी संघाचा कर्णधार केन विलियम्सन याची. तो देखील उर्वरित सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. 13 ऑक्टोंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात विल्यम्सनला ही दुखापत घडून आली. या सामन्यात ताबडतोब फलंदाजी करत असताना श्रीलंकेच्या अचूक थ्रोफिकेमुळे त्याच्या अंगठ्याला दुखापत घडून आली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kane Williamson (@kane_s_w)

केन विल्यमसन उर्वरित सामने खेळू शकणार?

विलियम्सनच्या अंगठ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तो उर्वरित स्पर्धेत खेळण्याची शक्यता फार कमी आहे. त्याचे न्यूझीलंड संघात नसणे हे त्या संघाला धोकादायक ठरू शकते. आयपीएल मध्ये तो हैदराबाद संघाकडून खेळतो त्याला इथल्या परिस्थितीचा परिपूर्ण अंदाज आहे.

तो संघात खेळात राहिला असला असता तर त्याचा फायदा नक्की झाला असता. आता त्याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून टॉम बंडल याला पर्यायी खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. विलियम्सन यांच्या जागी संघाच्या नेतृत्वाची धुरा हा टॉम लाथम हा सांभाळत आहे. आता विलियम्सन बेंचवर बसूनच ही संपूर्ण स्पर्धा पाहत राहील. 

श्रीलंकेचा कर्णधार दसून शंनाका यालाच पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो आता स्पर्धेबाहेर पडला आहे. त्याच्याजागी चमिका करुणारत्ने याची संघात पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

World cup 2023

सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ हा तुफान फार्मात आहे. सलग तीन विजय मिळवत गुणतालिकेत हा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांना या स्पर्धेचा विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाने अद्यापही विजयाचे खाते उघडलेले नाही. पहिल्या दोन्ही सामन्यात हा संघ एकही सामना जिंकू शकला नाही.

तसेच गुणतालिकेमध्ये हा संघ शेवटच्या स्थानावर आहे. यापूर्वी 1996 साली भारतात झालेल्या विश्वचषकात अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघ कशी कामगिरी करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..