World Cup Final: टीम इंडिया अंतिम सामन्यात पोहचताच पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागले, व्हिडीओ पोस्ट करत रोहित शर्मावर केले गंभीर आरोप..

World Cup Final:  ICC ODI World Cup 2023 मध्ये टीम इंडियाची उत्कृष्ट कामगिरी पाहून पाकिस्तान इतका चिडला आहे की, तिथले चाहते भारतावर नवनवे आरोप करत आहेत. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही बीसीसीआय आणि आयसीसीवर गंभीर आरोप केले आहेत. कधी त्याच्या मते आयसीसी भारताची बाजू घेते तर कधी ते म्हणतात की टीम इंडिया सामन्यात वेगळ्या चेंडूचा वापर करते. या मालिकेत आता पाकिस्तानच्या एका अनुभवी खेळाडूने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर टॉस फिक्सिंगचा आरोप केला आहे. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण….

World Cup Final: टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यावर पाकिस्ताचा रडीचा डाव, रोहित शर्मावर केला टॉस फिक्सिंगचा आरोप

World Cup Final: टीम इंडिया अंतिम सामन्यात पोहचताच पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागले, व्हिडीओ पोस्ट करत रोहित शर्मावर केले गंभीर आरोप..

भारतीय संघ आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर पाकिस्तान संघाकडून विचित्र गोष्टी समोर येत आहेत. काही दिग्गज खेळाडू संघावर फिक्सिंगचा आरोप करत आहेत, तर अनेक माजी पाकिस्तानी खेळाडू म्हणतात की, आयसीसी टीम इंडियाला पाठिंबा देत आहे. दरम्यान, माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदने भारतीय कर्णधार रोहित शर्मावर टॉस फिक्सिंगचा आरोप केला आहे.

 

“रोहित शर्माने योग्य गोलंदाजी केली नाही. विरोधी कर्णधाराला नाण्याची एकही बाजू दिसत नसताना नाणेफेक करून काय हरकत आहे? बीसीसीआय क्रिकेटवर नियंत्रण ठेवत आहे आणि आयसीसी त्यांना काहीच बोलत नाही. हा विश्वचषक नियोजित आहे आणि तो भारत जिंकेल. 2011 च्या विश्वचषकात भारताचा विजयही वादग्रस्त ठरला होता.

IND vs NZ live: पहिल्या सेमिफायनलमध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, ख्रिस गेल ला मागे सोडत केली अशी कामगिरी..

वापरलेली खेळपट्टी बीसीसीआयचा आणखी एक वादग्रस्त निर्णय आहे. आणि आयसीसी मुद्दाम बीसीसीआयला पाठीशी घालत आहे, असेही या पाकिस्तानी खेळाडूने म्हटले आहे.

 

World Cup Final: रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वच्या सर्व सामने जिंकत फायनलमध्ये धडक मारलीय.

विश्वचषकाच्या सुरवातीपासून ते आतापर्यंतचे सर्वच सामने जिंकत टीम इंडियाने आपला दबदबा निर्माण केला आहे. आता 19 तारखेला अंतिम सामना ही जिंकून विश्वचषक आपल्या नावे करण्याचा त्यांचा माणस असेल. दुसरीकडे रोहित शर्मा आणि टीम जबरदस्त फोर्ममधून जात आहेत. त्यामुळे हा विश्वचषक टीम इंडिया जिंकेल यात चाहत्यांना थोडाही संशय वाटत नाहीये. आता 19 तारखेला होणाऱ्या अंतिम सामन्यावर सर्वांचे लक्ष असेल..

World Cup Final: टीम इंडिया अंतिम सामन्यात पोहचताच पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागले, व्हिडीओ पोस्ट करत रोहित शर्मावर केले गंभीर आरोप..

आज दक्षिण  आफ्रिका आणि ऑस्ट्रोलिया यांच्यापैकी एक जण अंतिम फेरीस पात्र होईल..


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *