न्यूझीलंडकडून एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव होताच पॉइंट टेबल मध्ये मोठा बदल, आता फक्त हे 7 संघ खेळू शकणार वर्ल्ड कप.

सध्या श्रीलंकेचा क्रिकेट संघ हा न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघामध्ये एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील निर्णायक सामना हॅमिल्टन येथे खेळला गेला, जो न्यूझीलंड संघाने जिंकला.
श्रीलंका संघ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त 157 धावा बनवू शकला. त्यामुळे न्यूझीलंड संघाने अतिशय सहजपणे 157 धावांचा पाठलाग करत श्रीलंका संघाला धूळ चारत विजय मिळवला.
या सामन्यात झालेल्या श्रीलंकेच्या पराभवानंतर २०२३ च्या वर्ल्ड कप पॉइंट टेबल मध्ये मोठा बदल झालेला दिसून आला आहे. तसेच या पराभवामुळे श्रीलंकेचा संघ विश्वचषक सुपर लीगच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता टॉप-7 संघ थेट विश्वचषकात जाणार आहेत.
श्रीलंकेला हरवून न्यूझीलंडचा संघ हा पहिल्या स्थानावर पोहचला आहे.आणि श्रीलंका संघ हा थेट नवव्या स्थानावर पोहचला आहे. पॉइंट टेबल मध्ये इंग्लंड संघ हा दुय्यम स्थानावर आहे. तर पाकिस्तान संघ हा पाचव्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया देखील पॉइंट टेबल मध्ये 6 व्या क्रमांकावर आहे परंतु 120 गुणांसह थेट पात्र ठरला आहे.
वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संघ 8, 9 आणि 10 व्या स्थानावर आहेत त्यामुळं जवळपास ते यातून बाहेर पडतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2023 मध्ये होणारा वर्ल्ड कप हा भारतामध्ये होणार आहे त्यामुळं भारतीय संघ तयारी साठी जुडला आहे. त्यामुळे भारतीय संघाला थेट क्वालिफाय केले आहे.