World Cup Records: संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता या 2 संघांनी जिंकला होता विश्वचषक…

World Cup Records: संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता या 2 संघांनी जिंकला होता विश्वचषक...

World Cup Records: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत काही रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. 1975 ते आज तागायत पर्यंत 12 विश्वचषक स्पर्धा पार पडल्या आहेत. सध्या तेरावी विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. आयसीसीची मान्यता असलेल्या केवळ पाच संघांना आतापर्यंत विश्वचषक जिंकता आला आहे. यामध्ये वेस्ट इंडिज, भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंड या संघाचा समावेश आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज हे दोनच संघ असे आहेत, ज्यांनी दोन किंवा त्यापेक्षा अधिक विश्वचषक स्पर्धा जिंकले आहेत.

केन विल्यम्सन

World Cup Records : या दोन संघांनी जिंकलाय एकही  सामना न गमावता विश्वचषक

आतापर्यंत दोनच संघाने विश्वचषक स्पर्धेत एकही सामना न गमवता चषक मिळवला आहेत. अशा संघांमध्ये केवळ दोनच संघाचा समावेश आहे. ते म्हणजे वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया होय.

वेस्टइंडीजच्या संघाने 1975 मध्ये लॉईड यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषकावर नाव कोरले होते. या स्पर्धेत त्यांनी पाचही सामने जिंकून विश्वचषक आपल्या नावे केला होता. 1979 मध्ये वेस्टइंडीजच्या संघाने पुन्हा हा पराक्रम करून दाखवला. विशेष म्हणजे त्यांनी एकही सामना न गमवता विश्वचषकावर नाव कोरले होते. दोन्हीही स्पर्धेच्या वेळेस लॉईड हे वेस्टइंडीज संघाचे कर्णधार होते.

2003 साली ऑस्ट्रेलियाचा संघ रिकी पॉंटिंग याच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धेमध्ये उतरला होता. पॉंटिंगच्या संघाने सलग 11 सामने जिंकून विश्वचषकावर कब्जा मिळवला. एकाही सामन्यात पराभूत न होता विश्वचषकावर नाव कोरणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ होता.

World Cup Records: संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता या 2 संघांनी जिंकला होता विश्वचषक...

2007 साली ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनला. यावेळी संघाच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा रिकी पॉंटिंगच्या हाती होती. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलग 11 सामने जिंकले होते. विशेष म्हणजे वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया या संघाने सलग दोनदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला आहे. अशी कामगिरी अद्याप कोणत्याही संघाला करता आले नाही.

वेस्टइंडीजच्या संघाने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत दोनदा तर ऑस्ट्रेलियाने पाचव्यादा बाजी मारली आहे. तर भारतीय संघाने दोनदा आणि श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड यांनी प्रत्येकी एकदा विश्वचषकावर नाव कोरले होते. भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तुफान फार्मात आहे. भारतीय संघाला विजयाचा प्रभाव दावेदार ही मानला जात आहे. स्पर्धेत भारतीय संघाने सलग सहा सामने जिंकून आपल्या नावाला लौकिक असा खेळ देखील केला आहे. यंदा स्पर्धा माय देशात होणार असल्याने याचा फायदा भारतीय संघाला होणार आहे.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..