World Cup Semifinal & Final Schedule: विश्वचषक 2023 (World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे. दिवाळीनिमित्त रविवारी 12 नोव्हेंबर रोजी भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना रंगणार आहे. बेंगळुरू येथे होणारा हा सामना या विश्वचषकातील शेवटचा साखळी सामना असेल. त्यानंतर पुढील दोन दिवस सामना नाही. अशा स्थितीत आता बाद फेरीची चर्चा आहे ज्यामध्ये तीन सामने होणार आहेत, दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम फेरी. या सामन्यांसाठी आयसीसीने काय विशेष तयारी केली आहे जाणून घेऊया सविस्तर..
World Cup 2023: नॉकआउट सामन्यांचे संपूर्ण नियम काय आहेत?
आता जर आपण नॉकआऊट सामन्यांच्या नियमांबद्दल बोललो, तर सर्वप्रथम दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मात्र या तीन सामन्यांसाठी विशेष नियम ठेवण्यात आला आहे. हा नियम राखीव दिवसाचा नियम आहे.
या तीनही सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवले आहेत. म्हणजेच उपांत्य फेरीचे दोन्ही सामने एकाच दिवसात झाले नाहीत तर हे दोन्ही सामने चार दिवस सुरू राहू शकतात. या धर्तीवर अंतिम सामनाही दोन दिवस होऊ शकतो.
पावसाने उपांत्य फेरीत व्यत्यय आणल्यास, 15 तारखेला होणारा सामना 16 तारखेला पूर्ण होईल. 16 तारखेला होणारा उपांत्य फेरीचा सामना त्या दिवशी खेळता आला नाही तर तो दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल. रिझर्व्ह डेच्या नियमांनुसार, खेळ पहिल्या दिवशी जिथे थांबला होता त्याच ठिकाणापासून दुसऱ्या दिवशी सुरू होतो. अंतिम सामन्यासाठीही असेच नियम लागू होतात. पावसामुळे 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपचा निकाल जाहीर झाला नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबरला पूर्ण होईल.
World Cup 2023:सेमीफायनल आणि फायनलचे पूर्ण वेळापत्रक
- भारत विरुद्ध न्यूझीलंड – १५ नोव्हेंबर, पहिली उपांत्य फेरी (मुंबई, वानखेडे)
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १६ नोव्हेंबर, दुसरी उपांत्य फेरी (कोलकाता, ईडन गार्डन्स)
- अंतिम- 19 नोव्हेंबर, (अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम)
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..