- Advertisement -

टीम इंडिया जिंकू शकते 2023 विश्वचषकाचे विजेतेपद, हे 3 तगडे खेळाडू बनतील कर्णधार रोहितचे सर्वात मोठे शस्त्र!

0 1

 

प्रामुख्याने आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे परंतु आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे वेड आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच क्रिकेट चे वेड आहे हे आपल्याला माहीतच आहे.

 

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या 3 खेळाडू बद्दल सांगणार आहे जे खेळाडू भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतात. तर जाणून घेऊया कोण आहेत ते तीन जबरदस्त खेळाडू.

 

 

सध्या येणाऱ्या वर्षात 2023 मध्ये वर्ल्ड कप चे नियोजन आपल्या देशात होणार आहे तसेच वर्ल्ड कप साठी आपली भारतीय क्रिकेट संघ सुद्धा तयार आहे. परंतु वर्ल्ड कप जिंकण्यासाठी या 3 भारतीय खेळाडूंची मोठ्या प्रमाणात गरज आहे जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

 

 

 

शुभमन गिल :-

शुभमन गिल भारतीय संघाचा एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो.शुभमन गिल गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघासाठी अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये धावत आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय देखील आहे. अशा परिस्थितीत तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.

 

 

सूर्यकुमार यादव:-

 

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातील तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्या नावाचा डंका जगभर वाजत आहे. तसेच अत्यंत आक्रमक असलेला सूर्यकुमार यादव यंदाच्या वनडे विश्वचषकाचे विजेतेपद भारताला मिळवून देऊ शकतो. तो मैदानात सर्वत्र शॉट्स खेळतो तसेच त्याला MR.360 असे सुद्धा म्हंटले जाते एवढेच नव्हे तर एबी डिव्हिलियर्सही सूर्यकुमार यादव चा फॅन आहे.

 

 

 

हार्दिक पंड्या:-

 

हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच हार्दिक पांड्या हा अतिशय आक्रमक पने फलंदाजी आणि गोलंदाजीही करतो. हार्दिकने भारतीय संघासाठी महत्त्वाच्या खेळी खेळून अनेक वेळा भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.