एबी डिव्हिलियर्स: वर्ल्ड कप 2023 भारतात आयोजित करण्यात आला आहे, यामुळे सर्व क्रिकेट तज्ञांचा असा विश्वास आहे की ,भारतीय संघ वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणार आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स यावर विश्वास ठेवत नाही.
डिव्हिलियर्सने नुकतेच एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संघ नाही तर दुसरा संघ विश्वचषक जिंकणार आहे. चला तर मग जाणून घेऊया असा कोणता संघ आहे जो विश्वचषकाचे विजेतेपद भारतात खेळला जात असूनही जिंकू शकतो.
विश्वचषक कोण जिंकणार?
विश्वचषक 2023 5 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आणि 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. या विश्वचषकात 10 संघांनी भाग घेतला आणि त्यापैकी चार संघांनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, ज्यात भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत या विश्वचषकाची ट्रॉफी या चार संघांपैकी केवळ एकाच संघाकडे जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, या विश्वचषकाचा किताब फक्त भारतीय संघाच्या नावावर असेल, पण एबी डिव्हिलियर्सच्या मते, असे होणे थोडे कठीण आहे.
एबी डिव्हिलियर्सने सांगितले की कोणता संघ विश्वचषक जिंकेल?
जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक, एबी डिव्हिलियर्सचा असा विश्वास आहे की, विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत (IND vs SA) एकमेकांसमोर येतील. ज्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय संघाचा पराभव करून प्रथमच ट्रॉफी जिंकणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी एकदाही जिंकता आलेली नाही.परंतु यावेळी नक्कीच दक्षिण आफ्रिका विश्वचषक जिंकेल.
एबी डिव्हिलियर्स नुकताच मुंबईत एका शाळेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. जिथे त्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. याशिवाय एका विद्यार्थ्याने त्याला विश्वचषक विजेत्याबद्दल प्रश्नही विचारले. त्याला उत्तर देताना तो म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विश्वचषक जिंकेल असे मला वाटते.
पुढे बोलतांना एबी म्हणाला की,
“आतापर्यंत आफ्रिकेचा संघ विश्वचषक ट्रॉफी जिंकू शकलेला नाही, म्हणूनच दक्षिण आफ्रिकेचा संघ चॅम्पियन होईल असे मला वाटते. पण भारत जिंकला तरी माझा मित्र विराटसाठी मला आनंद होईल.
- हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..