World cup 2023 मध्ये ‘हा’ खेळाडू काढेल सर्वांत जास्त धावा.., दिग्गज माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने केली भविष्यवाणी..
भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यामध्ये टीम इंडियाने २-० अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. आता तिसरा सामना बुधवारी होणार आहे. शुभमन गिलने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने (Ab De villiers ) शुभमनचे कौतुक केले आहे. शिवाय शुभमन गिल विषयी त्याने एक रंजक भाकीतही केले आहे. गिल विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल, असे डिव्हिलियर्सने म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलतांना एबी डिव्हिलियर्स(Ab De villiers) म्हणाला, “शुबमनचे तंत्र अगदी सोपे आहे. त्याची शैली आणि तंत्र जगातील सर्वोत्तम खेळाडूंइतकेच सोपे आहे. स्टीव्ह स्मिथचे उदाहरण घेतले तर तो खूप वेगळ्या तंत्राने खेळतो. तर शुभमन गिल अतिशय पारंपरिक आणि सोप्या तंत्राने खेळतो. त्याच्याकडे खूप ताकद आहे. म्हणून मला शुभमनचा खेळ आणि शैली खूप आवडते.
डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “आम्ही शुभमनला आयपीएलमध्येही पाहिले आहे. तो अजूनही बराच तरुण आहे. यासोबतच तो अनुभवीही होत आहोत. भविष्यात त्याच्याकडून आणखी चांगली कामगिरी पाहायला मिळेल. माझ्या मते शुभमन या विश्वचषकात (Worldcup 2023) सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.

युवा फलंदाज शुभमन गिल सध्या फॉर्मात आहे हे विशेष. अलीकडेच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ७४ धावांची शानदार खेळी केली होती. गिलने 63 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. भारताने हा सामना 5 विकेटने जिंकला तर गिलने दुसऱ्या वनडेतही शतक झळकावले. त्याने 97 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 399 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन खेळाडू केवळ 217 धावा करू शकले.
आता डिव्हीलीअर्सचा अंदाज खरा ठरतो का ? आणि शुभमन खरच वर्ल्डकपमध्ये सर्वांत जास्त धावा करणारा खेळाडू बनतो का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.
हे पण वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल.