World cup 2023, PAK vs SL: बलाढ्य पाकिस्तानला श्रीलंका देणार कडवी झुंज, असे असतील दोन्ही संघ..
मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी आयसीसी क्रिकेट विश्वचषकात (World cup 2023) दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना इंग्लंड आणि बांगलादेश (Eng vs Ban) यांच्यात सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका (Pak vs SL) यांच्यात होणार आहे, जो दुपारी 2 वाजता सुरू होईल.
पाकिस्तानने आपला पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळला, जो 99 धावांनी जिंकला, परंतु त्यांचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध विश्वचषकातील (World cup 2023) सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. श्रीलंकेच्या फलंदाजांनी झुंज दिली असली तरी त्यांची लढत जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती.
अशा स्थितीत आता आशियातील या दोन बड्या संघांमध्ये आजचा सामना कसा होणार? हे पाहावे लागेल. आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेतील सुपर-4 फेरीच्या सामन्यादरम्यान या दोघांमध्ये शेवटची गाठ पडली होती. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.एक नजर टाकूया सामन्याबद्दलच्या काही महत्वाच्या माहिती वर.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका ( Pak vs SL): सामन्याची माहिती
- स्पर्धा: ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023, सामना, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
- सामन्याची तारीख: 10 ऑक्टोबर 2023
- वेळ : भारतीय वेळेनुसार दुपारी २ वा
- स्थळ: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका( Pak vs SL) : हेड टू हेड
या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १५६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने ९२ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने ५९ सामने जिंकले आहेत. त्यामुळे रेकॉर्डनुसार पाकिस्तानचा संघ आतापर्यंत श्रीलंकेवर वरचढ ठरला आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका( Pak vs SL): पीच रिपोर्ट
आज होणारा पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यातील सामना हैद्राबादच्यामैदानावर खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या खेळपट्टीवर ‘फलंदाजांना’ नेहमी मदत मिळते कारण ही फलंदाजीस योग्य पीच आहे. सराव सामन्यांसह या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये या खेळपट्टीवरील सरासरी धावसंख्या 296 आहे, याचा अर्थ असा की ,आजही उच्च स्कोअरिंग सामना होऊ शकतो. या खेळपट्टीवर संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतील.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (pak probable playig 11)

इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
श्रीलंकेचे प्लेइंग इलेव्हन(Sl Probable Playing 11)
पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (सी), दुनिथ वेलालेज, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..