ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
पाकिस्तान क्रिकेट ने जागतिक क्रिकेटला एकापेक्षा एक धुरंदर गोलंदाज दिले आहेत. म्हणूनच तर पाकिस्तानला वेगवान गोलंदाजाची खाण मानली जाते. पण असे असले तरी याच देशाच्या एका गोलंदाजाच्या नावावर एका नकोशा विक्रमाची इतिहासात नोंद झाली होती. अशाच एका दुर्मिळ विक्रमाची माहिती आज आपण घेणार आहोत.नक्की काय आहे तो नकोसा विक्रम आणि कसा झाला या पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर जाणून घेऊया सविस्तर…
मोहम्मद सामी याने पाकिस्तानकडून खेळताना वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठे षटक टाकण्याचा विक्रम केला होता.
वास्तविक पाहता, वन डे क्रिकेटमध्ये एका षटकात गोलंदाजाला सहा चेंडू टाकायचे असतात. मात्र मोहम्मद सामीने एका षटकात तब्बल 17 चेंडू टाकले होते. हे क्रिकेटच्या इतिहासातले आतापर्यंतचे सर्वात मोठे षटक ठरले आहे. 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध वन डे सामना झाला होता. त्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. इंजमाम उल हक हा त्या संघाचा कर्णधार होता. सामीने एका षटकात सात चेंडू आणि चार नोबल टाकले होत. 17 चेंडूंमध्ये तब्बल 22 धावा दिल्या होत्या.
मोहम्मद सामीने सुरुवातीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पाकिस्तानच्या कसोटी संघात प्रवेश केला. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाच विकेट्स सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत, त्याने हॅट्ट्रिक आपल्या गोलंदाजीचा धाक जगाला दाखवून दिला. तसेच वनडे क्रिकेटमध्ये देखील त्याने हॅट्रिक घेतली आहे.
मोहम्मद सामी क्रिकेट कारकीर्द..
पाकिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने 2001 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पाकिस्तानकडून त्याने 36 कसोटी सामन्यात 85 गडी बाद करण्यात यश मिळवले. तर 87 वनडे सामन्यात 121 विकेट घेतल्याची नोंद त्याच्या नावावर आहे. तर 13 टी 20 सामन्यात 21 गडी बाद केले होते. 2003 च्या विश्वचषकानंतर वसीम आक्रम आणि वकार युनूस यांच्यानंतर तो पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल असे अनेकांना वाटले होते. मात्र त्याने सर्वांच्याच अपेक्षा भंग केल्या.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.