WPL 2023 MI vs GG: गुजरात आणि मुंबई आज पुन्हा भिडणार.. हरमनप्रीतचा विजयी रथ रोकु शकणार का गुजरात? अश्या असतील दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
WPL 2023 MI vs GG: मुंबईत खेळल्या जाणाऱ्या महिला प्रीमियर लीग 2023 मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना खेळवला जाईल. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल.
हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. मुंबईने चार सामने खेळले असून सर्व जिंकले आहेत. संघ 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.

दुसरीकडे, स्नेह राणाच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्सच्या संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संघाने लीगमधील 4 पैकी फक्त एक सामना जिंकला आहे, तर तीन सामने गमावले आहेत. गुजरात जायंट्स 2 गुण आणि -3.397 च्या नेट रनरेटसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत पुढे टिकून राहण्यासाठी हा सामना त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो.
पहिल्या सामन्यात मुंबईने दणदणीत विजय नोंदवला होता.
या स्पर्धेतील पहिला सामना या दोन संघांमध्येच खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने २१२ धावांची मजल मारली, त्याला प्रत्युत्तर म्हणून गुजरातचा संघ पत्त्यासारखा विखुरला गेला आणि १४४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या सामन्यात गुजरातच संघ मागील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्नात असतील.
स्नेह रानाच्या कामगिरीकड असेल सर्वांचे लक्ष..
Chai, local, aapli Mumbai ki ladki! 🫶
Haters will say this is not real. 😤@meliekerr10 @YastikaBhatia | #OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPL2023 pic.twitter.com/ZnzU3oLKPw
— Mumbai Indians (@mipaltan) March 13, 2023
WPL 2023 GG vs MI Live Streaming: TV वर लाइव्ह कसे पहावे?
तुम्ही स्पोर्ट्स18 वर मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील WPL 2023 सामना पाहू शकता.
WPL 2023 GG vs MI Live Streaming: मोबाईलवर लाइव्ह कसे पहावे?
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील WPL 2023 सामना मोबाईलवर Jio Cinema अॅपवर पाहता येईल.
हे ही वाचा..
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…