WPL 2024: आयपीएलप्रमाणेच आता क्रिकेट चाहते WPL (Women Premier League) म्हणजेच महिला प्रीमियर लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत. बीसीसीआयने यावर्षी (2023) मार्चमध्ये महिला आयपीएलला सुरुवात केली. या स्पर्धेचा पहिला हंगाम अतिशय यशस्वी झाला आणि जगभरातील अव्वल महिला खेळाडूंनी त्यात भाग घेतला.
स्पर्धेचा उद्घाटन हंगाम मुंबईत खेळला गेला, जो हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जिंकला होता. आता क्रिकेट चाहत्यांना या महिला क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची प्रतीक्षा आहे. आता बातमी येत आहे की, या स्पर्धेच्या पुढील हंगामातील सामने मुंबई आणि बंगळुरूमध्ये आयोजित केले जाऊ शकतात. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
WPL 2024: मुंबई आणि बंगळुरूमध्ये होऊ शकते सर्व सामन्यांचे आयोजन.
IPL LATEST NEWS च्या अहवालानुसार, WPL चा पुढील हंगाम फेब्रुवारी 2024 मध्ये आयोजित केला जाऊ शकतो आणि भारतातील मुंबई आणि बेंगळुरू या दोन शहरांमध्ये सामने खेळवले जाऊ शकतात.
काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, यावेळी ही महिला क्रिकेट लीग आयपीएल फॉर्मेटमध्ये आयोजित केली जाईल, ज्यामध्ये सर्व संघ होम आणि अवे सामने खेळताना दिसतील, परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
अहवालानुसार यंदाही पाच संघ सहभागी होणार असून स्पर्धेचे स्वरूप पहिल्या सत्राप्रमाणेच असेल. सर्व पाच संघ राऊंड रॉबिन प्रकारात प्रत्येकी 2 वेळा आमनेसामने येतील. त्यानंतर टॉप-3 संघ बाद फेरीत पोहोचतील. टेबलच्या शीर्षस्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर क्रमांक 2 आणि 3 संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाईल आणि विजेता संघ अंतिम फेरीत जाईल.
बीसीसीआयने 19 ऑक्टोबर रोजी एक यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये पाच संघांनी 60 खेळाडूंना कायम ठेवले होते आणि 29 खेळाडूंना सोडले होते. या वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात महिला प्रीमियर लीग 2024 साठी लिलाव आयोजित केला जाईल, ज्यामध्ये सर्व संघांना त्यांच्या संघात नवीन खेळाडूंचा समावेश करण्याची संधी मिळेल.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..