WPL 2024: स्नेह राणाचा पत्ता कट, गुजरात जायंट्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा…

WPL 2024: स्नेह राणाचा पत्ता कट, गुजरात जायंट्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा...

 

WPL 2024:  महिला प्रीमियर लीग (WPL 2024) चा दुसरा हंगाम 23 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. यावेळी लीगचे सामने दोन टप्प्यात खेळवले जातील. पहिला टप्पा बेंगळुरू आणि दुसरा टप्पा दिल्लीत असेल. महिला प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीत पाच संघांमध्ये एकूण 22 सामने होणार आहेत. ही लीग सुरू होण्यापूर्वी गुजरात जायंट्स संघात मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात फ्रँचायझीने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियन महिला संघाची फलंदाज बेथ मुनी डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात गुजरात जायंट्सचे नेतृत्व करेल, तर भारतीय अष्टपैलू स्नेह राणा उपकर्णधार असेल.  WPL च्या पहिल्या सत्रात मुनीला गुजरात जायंट्स संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु दुखापतीमुळे तिला  पहिल्या सामन्यानंतर स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. यानंतर संपूर्ण हंगामात स्नेह राणाने संघाचे नेतृत्व केले.

WPL 2024: Run-machine Beth Mooney returns as skipper of Gujarat Giants,  Sneh Rana named vice-captain - India Today

बेथ मुनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

WPL 2024: स्नेह राणाचा पत्ता कट, गुजरात जायंट्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा...

 

2014, 2018, 2020 आणि 2023 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघांचा भाग असण्याव्यतिरिक्त, ती 2022 ODI विश्वचषक आणि 2022 च्या बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक विजेत्या संघांचा भाग होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *