WPL 2023 मध्ये झालेले हे 10 विक्रम यावर्षी मोडले जाऊ शकतात, मात्र ‘हा’ एक विक्रम मोडणे होणार सर्वच महिलांसाठी अवघड..

WPL 2023 मध्ये झालेले हे 10 विक्रम यावर्षी मोडले जाऊ शकतात, मात्र 'हा' एक विक्रम मोडणे होणार सर्वच महिलांसाठी अवघड..

WPL 2024 Records :  भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महिला प्रीमियर लीगच्या रूपाने एक नवा आणि ऐतिहासिक अध्याय सुरू झाला आहे. WPL चा दुसरा हंगाम सुरु झाला आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये देशातील आणि परदेशातील अनेक दिग्गज खेळाडूंनी मोठमोठ्या विक्रमानं गवसणी घातली होती. यंदाही तशीच कामगिरी संघाना त्यांच्याकडून अपेक्षित असेल. मात्र यंदाचा हा हंगाम पहिल्या हंगामपेक्षा जास्त रोमांचक होणार यात  शंका नाही. कारण  गोलंदाजांनी 5 बळी  घेण्याची गोष्ट असो किंवा सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याची गोष्ट असो, मागच्या वर्षी जसे झटपट विक्रम रचले गेले. तेच विक्रम मोडले जाणार कारण यंदा संघ मागच्यावर्षीपेक्षा जास्त धोकादायक दिसत आहेत. चला तर जाणून घेऊया असे कोणते विक्रम आहेत जे मागच्या वर्षी झाले होते मात्र लगेच एका वर्षात WPL 2024 च्या हंगामात मोडले जाऊ शकतात.

WPL 203 मध्ये झालेले हे 10 विक्रम यावर्षी मोडले जाऊ शकतात, मात्र हा एक विक्रम मोडणे होणार सर्वच महिलांसाठी अवघड..

 

आतापर्यंत डब्ल्यूपीएलमध्ये परदेशी खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. सर्वोत्तम गोलंदाजी असो की सर्वोत्तम खेळी, या लीगमध्ये केवळ परदेशी खेळाडूच पुढे दिसतात. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मेग लॅनिंगचे नाव आहे, तर ॲलिसा हिलीने WPL मधील सर्वोत्तम खेळी खेळली आहे.

WPL 2024: स्नेह राणाचा पत्ता कट, गुजरात जायंट्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा...

WPL2023 मधील सर्वोत्तम गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सचा (DC) एक भाग असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मॅरिझान कॅपने गुजरात जायंट्सविरुद्ध १५ धावांत ५ बळी घेतले होते. डब्ल्यूपीएल 2023 मधील हा सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल आहे. तिने आपल्याच संघातील सदस्य तारा नॉरिसचा विक्रमही मोडीत काढला आहे.

 

WPL 2023  मधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर

महिला प्रीमियर लीगमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीच्या नावावर आहे, जिने आरसीबीविरुद्ध ४७ चेंडूत ९६ धावा केल्या. या खेळीत हेलीने 18 चौकार आणि 1 षटकार मारला होता. मागच्या हंगामातील हा सर्वोत्तम स्कोर मोडून यावर्षी एखादी खेळाडू शतक नक्कीच झळकावू शकते.

WPL 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स

डब्ल्यूपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचे श्रेय मुंबई इंडियन्सची फिरकी गोलंदाज सायका इशाकला जाते. सायका इशाकने 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. या यादीत सोफी एक्लेस्टन दुसऱ्या तर हेली मॅथ्यूज तिसऱ्या क्रमांकावर आहे. एक्लेस्टनने 7 तर मॅथ्यूजने 6 विकेट्स घेतल्या आहेत.

WPL 2023 मध्ये 5 विकेट्स

डब्ल्यूपीएल 2023 मध्ये तब्बल  3 गोलंदाजांनी 5 हून अधिक विकेट्स घेतले होते घेतला आहे. पहिल्यांदा अमेरिकेची गोलंदाज तारा नॉरिस हिने ही कामगिरी केली होती, त्यानंतर किम गर्थ आणि नंतर मारिझान कॅपनेही 5 विकेट घेतल्या होत्या. यंदाच्या हंगामात (WPL 2024) एखादा गोलंदाज 6विकेट्स घेऊन हा विक्रम नक्कीच मोडू शकतो.

WPL2023 मधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम

आरसीबीविरुद्ध, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली होती. या स्पर्धेतील ही सर्वात मोठी आणि संस्मरणीय भागीदारी आहे. दिल्लीने हा सामना 60 धावांनी जिंकला होता. आता wpl 2024 मध्ये ही भागीदारी कोण मोडू शकेल का नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.

WPL मध्ये सर्वोच्च स्कोअर

डब्ल्यूपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर आहे. दिल्लीने आरसीबीविरुद्ध 223 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. या सामन्यात मेग लॅनिंगने 72 आणि शेफाली वर्माने 84 धावा केल्या.

WPL चे सर्वात वेगवान अर्धशतक (fastest Half century in wpl history)

महिला प्रीमियर लीगमधील सर्वात वेगवान अर्धशतकाबद्दल बोलायचे तर, हा विक्रम गुजरात जायंट्सची सलामीवीर सोफी डंकलेच्या नावावर आहे, जिने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण करून हा विक्रम केला. त्याने हा विक्रम आरसीबीविरुद्ध केला.

सर्वाधिक अर्धशतके

डब्ल्यूपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सची फलंदाज मेग लॅनिंगच्या नावावर आहे. मेग लॅनिंगने 4 सामन्यात दोन अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, तिची सहकारी शेफाली वर्मानेही दोन अर्धशतके झळकावली आहेत.

WPL चे पहिले अर्धशतक (Fisrt wpl half century)

WPL 2023 मध्ये झालेले हे 10 विक्रम यावर्षी मोडले जाऊ शकतात, मात्र 'हा' एक विक्रम मोडणे होणार सर्वच महिलांसाठी अवघड..

डब्ल्यूपीएलचे पहिले अर्धशतक (Fisrt wpl half century) मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीतच्या नावावर आहे. हरमनप्रीत कौरने गुजरातविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ६५ धावांची खेळी केली होती.

सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

महिला प्रीमियर लीगबद्दल (WPL) बोलायचे झाल्यास, सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम भारतीय सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माच्या नावावर आहे, जी डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. शेफाली वर्माने आतापर्यंत 4 सामन्यात 10 षटकार मारले आहेत.

तर मित्रांनो, हे होते ते काही विक्रम जे यंदाच्या WPL 2024 मध्ये नक्कीच मोडले जाणार मात्र आता कोणता खेळाडू कोणते विक्रम मोडू शकेल, हे येणारी वेळच सांगेल. क्रिकेटबद्दल अशीच माहिती वाचण्यासाठी आम्हाला फोलो करायला विसरू नका..


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:-

भारतातील सर्वांत श्रीमंत असलेल्या ‘या’ 5 हिंदू मंदिरात संपूर्ण देशाचे कर्ज चुकवता येईल एवढा पैसा जमाय.

जाणून घ्या, कोण आहे चेन्नई सुपर किंग चा बाप ? 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *