वयाच्या 20 व्या वर्षी WPL AUCTION मध्ये 2 कोटी रुपयांची बोली लागलेली भारतीय खेळाडू काशवी गौतम आहे कोण? एकाच सामन्यात घेतल्या होत्या 10 विकेट्स…

वयाच्या 20 व्या वर्षी WPL AUCTION मध्ये 2 कोटी रुपयांची बोली लागलेली भारतीय खेळाडू काशवी गौतम आहे कोण? एकाच सामन्यात घेतल्या होत्या 10 विकेट्स...

WPL AUCTION : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यावर्षीपासून आयपीएलच्या धर्तीवर महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL चे आयोजन केले होते. यात एकूण पाच संघांनी सहभाग घेतला. WPL चा पुढचा सिझन येणार आहे. हा हंगाम 2024 मध्ये खेळवला जाणार असून त्यासाठी खेळाडूंचा लिलाव 9 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावात एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पाच संघ प्रयत्न करणार आहेत. गेल्या मोसमात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले होते. याशिवाय या लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे संघ आहेत.

मुंबईने 13 खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर दिल्लीने 14 खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्ली गेल्या मोसमातील उपविजेता संघ आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या यूपीनेही १३ खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर गुजरातने आपल्या 10 खेळाडूंना सोडले होते. त्याचवेळी बंगळुरूने आपल्या संघातील निम्मे विदेशी खेळाडू सोडले होते.

वयाच्या 20 व्या वर्षी WPL AUCTION मध्ये 2 कोटी रुपयांची बोली लागलेली भारतीय खेळाडू काशवी गौतम आहे कोण? एकाच सामन्यात घेतल्या होत्या 10 विकेट्स...

WPL AUCTION :कोण आहे काशवी गौतम?

काशवी ही उजव्या हाताची वेगवान गोलंदाज असून तो मोठे फटके मारण्यासही सक्षम आहे. 2020 मध्ये महिलांच्या घरगुती अंडर-19 स्पर्धेत चंदीगडसाठी अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तिने हॅटट्रिकसह दहा विकेट्स घेतल्या होत्या. यासह त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. याच कारणामुळे ती सर्व फ्रँचायझींच्या नजरेत राहिली होती.

इच्या उंचीमुळे  खेळपट्टीवरून चांगली उसळी मिळते आणि हीच तिची  सर्वात मोठी ताकद आहे. ती गेल्या वर्षी महिला प्रीमियर लीग लिलावात न विकली गेली होती, परंतु तिला तिचा वेग वाढवण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यावर तिने काम केले आणि काशवीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

वयाच्या 20 व्या वर्षी WPL AUCTION मध्ये 2 कोटी रुपयांची बोली लागलेली भारतीय खेळाडू काशवी गौतम आहे कोण? एकाच सामन्यात घेतल्या होत्या 10 विकेट्स...

वरिष्ठ महिला टी20 ट्रॉफीमध्ये तिने सात सामन्यांमध्ये 4.14 च्या इकॉनॉमीसह 12 बळी घेतले. हाँगकाँगमधील ACC इमर्जिंग टूर्नामेंट जिंकणाऱ्या भारतीय अंडर-23 संघाचा ती भाग होती. अलीकडेच ती अ मालिकेदरम्यान दोन सामन्यांचा भाग होती, ज्यामध्ये तिने भारत अ संघासाठी तीन विकेट घेतल्या होत्या.

भारतीय महिला क्रिकेटमध्ये चांगल्या वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. याचा फायदा काशवीला झाला. गुजरात व्यतिरिक्त, यूपी आणि आरसीबी संघ देखील काशवीला विकत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते, परंतु दोन्ही संघांच्या पर्समध्ये इतके पैसे नव्हते. याच कारणामुळे काशवीचा समावेश करण्यात गुजरात संघाला यश आले. आता त्याच्या किमतीला न्याय देण्याचे मोठे आव्हान काशवीसमोर असेल.

 

WPL AUCTION : लिलावाचे लाइव्ह अपडेट्स येथे वाचा-

वयाच्या 20 व्या वर्षी WPL AUCTION मध्ये 2 कोटी रुपयांची बोली लागलेली भारतीय खेळाडू काशवी गौतम आहे कोण? एकाच सामन्यात घेतल्या होत्या 10 विकेट्स...

काशवी गौतमला गुजरातने दोन कोटींना विकत घेतले

यूपीने वृंदा दिनेशला 1.30 कोटींना विकत घेतले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या शबनम इस्माईलला मुंबई इंडियन्सने 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

भारतीय संघाची फिरकीपटू एकता बिश्तला आरसीबीने ६० लाखांना विकत घेतले आहे.

श्रीलंकेचा दिग्गज चमरी अटापट्टूला कोणीही खरेदीदार मिळाला नाही.

भारतीय वेगवान गोलंदाज मेघना सिंगला गुजरातने 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

जॉर्जिया वेअरहॅमला बंगळुरूने 40 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

डिआंड्रा डॉटिनला खरेदीदार मिळाला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले.

ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्डला गुजरात जायंट्सने 1 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

यूपीने डॅनी व्याटला 30 लाख रुपयांमध्ये जोडले आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *