WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

WTC Point Table: सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA 1st Test) लाजिरवाण्या पराभवानंतर, भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे. डाव आणि 32 धावांच्या या मोठ्या पराभवामुळे टीम इंडियाची आता पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर पाकिस्तान अजूनही फायद्यात आहे.

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

 

या विजयाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला WTC गुणतालिकेत अव्वल स्थानावर नेले आहे, जरी हा सामना चालू चक्रातील पहिला सामना होता आणि अजूनही बरेच सामने बाकी आहेत. सध्या पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पण त्यांचे सध्याचे स्थान धोक्यात आले आहे, कारण पाकिस्तान संघ मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे.

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार आहे

पहिल्या डावात २४५ धावा केल्यानंतर भारताची फलंदाजी कोलमडली आणि दक्षिण आफ्रिकेच्या ४०८ धावांना प्रत्युत्तर देताना दुसऱ्या डावात ३४.१ षटकात १३१ धावांत सर्वबाद झाला. आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

टीम इंडिया आता 3 ते 7 जानेवारी दरम्यान केपटाऊनमध्ये दौऱ्यातील शेवटचा सामना खेळणार आहे, त्यामुळे तिची नजर मालिकेत बरोबरी करण्यावर असेल. दरम्यान, यजमान संघ त्यांचा नियमित कर्णधार टेंबा बावुमाशिवाय असेल, जो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कसोटीतून बाहेर पडला आहे.


हेही वाचा:

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *