- Advertisement -

रिंकू सिंगने 5 षटकार मारलेल्या ‘गोलंदाज’ अजूनही गुजरातच्या प्लेईंग 11 मधून बाहेर, वजन कमी झाले, तब्येतदेखील खराब.. हार्दिक पंड्याने केला मोठा खुलासा..

0 0

रिंकू सिंगने 5षटकार मारलेल्या गोलंदाज अजूनही प्लेईंग 11 मधून बाहेर, वजन कमी झाले, तब्येतदेखील खराब.. हार्दिक पंड्याने केला मोठा खुलासा..


९ एप्रिलला आयपीएलमध्ये अहमदाबादच्या  मैदानावर गुजरातचा (GT) सामना कोलकाताशी  (KKR) झाला. या सामन्यात मैदान गाजवल ते कोलकत्ता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगने.. रिंकूच्या धडाकेबाज खेळीमुळे कोलकाताला तो सामना जिंकता आला. त्या सामन्यात गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात 29 धावांचा बचाव करायचा होता, पण त्यातही गुजरातचे गोलंदाज अपयशी ठरले. अलीकडेच त्या सामन्याबद्दल आणि गोलंदाज यश दयालबद्दल स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की, त्या सामन्यापासून दयालची तब्येत खराब आहे.

रिंकूच्या पाच षटकारानंतर यश दयालचे वजन कमी झाले,हार्दिक पंड्याचा खुलासा..

गुजरातचा वेगवान गोलंदाज यश दयाल ९ एप्रिलचा दिवस कधीच विसरणार नाही. त्याच्यावर विश्वास व्यक्त करत गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने त्याला शेवटचे षटक दिले. ज्यामध्ये दयालला 29 धावांचा बचाव करता आला नाही आणि गुजरातला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

'गोलंदाज

सामना संपल्यानंतर लोकांनी रिंकू सिंगच्या स्तुतीसाठी भरपूर  गोष्टी केल्या, पण दरम्यान यश दयाल कुठेतरी गायब झाला. त्या सामन्यानंतर दयाल गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनचादेखील तो भाग नाही.

अजिंक्य रहाणेला संघात घेण्यासाठी स्वतः धोनीने दिला होता खास सल्ला; चेन्नई सुपर किंग्सच्या मालकाने केला मोठा खुलासा..!

गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दयाल दिसत नसल्याबद्दल स्टार स्पोर्ट्सने हार्दिकशी चर्चा केली तेव्हा तो म्हणाला, ‘यश दयाल कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर आजारी पडला आणि त्यामुळेच त्याने 7-8 किलो वजन कमी केले. त्यावेळी त्याला व्हायरल इन्फेक्शन देखील झाला होता. त्याला ज्या प्रकारच्या दडपणाचा सामना करावा लागला, मैदानावर येण्यासाठी सध्या त्याची स्थिती चांगली नाही. आता त्याला मैदानात यायला थोडा वेळ लागेल.

हार्दिक पुढे म्हणाला, “आता येणाऱ्या सामन्यांमध्ये गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दयालला स्थान मिळणे कठीण आहे, त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला मोहित शर्मा शानदार गोलंदाजी करत आहे. त्या सामन्यानंतर मात्र यशमध्ये बराच बदल झाला आहे नंतर यश दयाल खूप निराश दिसत होता आणि सहकारी खेळाडू त्याला धीर देताना दिसले.

गोलंदाज

यश संघातून बाहेर झाल्यानतर त्याच्याजागी मोहित शर्मा चांगली कामगिरी करत असल्यामुळे आजूनही यश संघाच्या प्लेईंग ११ मधून बाहेर आहे. आता या हंगामात यश परत एखादा सामना खेळतांना दिसू शकेल का नाही, हे सांगणे सध्या तरी अवघड आहे.


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.