संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये एकदाही बाद झाला नव्हता ‘हा’ फलंदाज, क्रिकेटच्या इतिहासात असं करणारा आहे एकमेव भारतीय खेळाडू..!
सचिनपासून विराटपर्यंत सर्वच खेळाडू अनेकवेळा शून्यावर आऊट झाले होते पण आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूबद्दल सांगणार आहोत जो कधीही शून्यावर आऊट झाला नव्हता. हा खेळाडू परदेशी नसून आपल्याच देशाचा असून भारताला विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. चला तर जाणून घेऊया नक्की कोण आहे हा खेळाडू?
या खेळाडूला संपूर्ण कारकीर्द कुणीही बाद करू शकले नाही.
आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत जो आहे भारताचा माजी फलंदाज ‘यशपाल शर्मा’. यशपाल शर्माच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे जो संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही शून्यावर बाद झाला नाही. कधीही शून्यावर बाद न होणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. 7 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या या फलंदाजाने आपल्या 42 एकदिवसीय सामन्यांच्या 40 डावांमध्ये 883 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. तर कसोटी सामन्यात त्याने 37 सामन्यांच्या 59 डावात दोन शतके आणि 9 अर्धशतकांसह 1606 धावा केल्या. एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याला कोणीही शून्यावर बाद करू शकले नाही.

1983 च्या विश्वचषकात यशपाल शर्माचे होते महत्त्वाचे योगदान.
1983 च्या विश्वचषकात भारताच्या विजयात यशपाल शर्माचे महत्त्वाचे योगदान होते. यशपालने या स्पर्धेत 240 धावा केल्या होत्या. या खेळाडूने खेळलेल्या खेळीमुळेच भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला. यशपाल शर्माने 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर हा काळ त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात सुवर्णकाळ होता. यशपालचा हा विक्रम आजपर्यंत कुणीही मोडू शकले नाहीये.
हेही वाचा: