यशस्वी जयसवालचे वादळ…! केवळ एवढ्या चेंडूत पूर्ण केले आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत तेज अर्धशतक, अशी मागीती करणारा ठरला एकमेव खेळाडू..
यशस्वी जयसवालचे वादळ…! केवळ एवढ्या चेंडूत पूर्ण केले आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत तेज अर्धशतक, अशी मागीती करणारा ठरला एकमेव खेळाडू..
राजस्थान रॉयल्सचा (RR) सलामीवीर फलंदाज यशस्वी जयसवालने (Yashsvi Jaiswal) गुरुवारी (11 मे) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध आयपीएल 2023 च्या 56 व्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावून इतिहास रचला. जैस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या. त्याने 13 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याने 18 चेंडूत केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने आपल्या डावातील 82 धावा केल्या.
या झंझावाती खेळीदरम्यान जयस्वालने 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
https://twitter.com/mrfayazmulla/status/1656849542636240899?s=20
याआधी सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम केएल राहुल आणि पॅट कमिन्सच्या नावावर होता. राहुलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आणि कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध १४-१४ चेंडूंत अर्धशतक झळकावले.
यशस्वी जयसवालने शानदार फलंदाजी करताना नितीश राणाच्या डावाच्या पहिल्याच षटकात २६ धावा केल्या. आयपीएलमध्ये पहिल्या षटकात फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा.
विशेष म्हणजे या सामन्यात राजस्थानने कोलकाताचा 9 गडी राखून पराभव केला. कोलकाताच्या 149 धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थान संघाने 13.1 षटकात 1 गडी गमावून 151 धावा करत विजय मिळवला.

12 सामन्यांमधील सहाव्या विजयासह राजस्थानचे 12 गुण झाले असून, संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचवेळी कोलकाताचा तितक्याच सामन्यांमध्ये सातवा पराभव झाला असून 10 गुणांसह संघ सातव्या क्रमांकावर आहे.