- Advertisement -

Viral Video: 16 चौकार, 8 षटकार…. युवा ‘यशस्वी जयसवाल’ने ठोकले आयपीएलमधील पहिले शतक, मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकल्या तब्बल एवढ्या धावा.. सेलिब्रेशनचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0 4

16 चौकार, 8 षटकार…. युवा यशस्वी जयसवालने ठोकले आयपीएलमधील पहिले जबरदस्त शतक, सेलिब्रेशनचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


सध्या देशभरात आयपीएलची जोरदार हवा सुरु आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून या हंगामात एकापेक्षा एक चुरशीचे सामने प्रेक्षकांना दररोज पाहायला मिळत आहेत. आज आयपीएलचा ४२ वा सामना मुंबई इंडियन्स  आणि राजस्थान रॉयल्स (Mi vs RR) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede stadium)खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) अवघ्या ५३ चेंडूत शतक ठोकले. या मोसमातील हे तिसरे शतक आहे. यशस्वी जयवालने (Yashasvi Jaiswal)  13 चौकार आणि 6 षटकार खेचून आपले शतक पूर्ण केले आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा जोरदार मारा केला.

यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आपल्या संघासाठी डावाची सलामी देण्यासाठी आला होता. एका बाजूने विकेट पडत राहिल्या, मात्र जयस्वालने निर्भयपणे फलंदाजी सुरूच ठेवली. शतकानंतरही या खेळाडूने वेगवान फलंदाजी सुरूच ठेवली. तो 62 चेंडूत 124 धावा करून  नाबाद परतला. या खेळीत त्याने एकूण 16 चौकार आणि 8 षटकार मारले आहेत.

यशस्वी जयसवालच्या फलंदाजीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तो शतक झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करतांना दिसत आहे. शिवाय डगआउटमध्ये बसलेल्या इतर सहकाऱ्यांनी देखील यशस्वीच्या या यशाचाआनंद उचलत जोरदार सेलिब्रेशन केले.

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना थेट स्कोअर (MI vs RR LIVE SCORE)

यशस्वी जयसवाल

वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना राजस्थानने (RR) २० षटकांत विकेट गमावून 212 धावा केल्या. आता मुंबईला जिंकायचे असेल तर  213 धावा कराव्या लागतील. तसेच आयपीएलच्या इतिहासातील हा 1000 वा सामना आहे. या लीगच्या पहिल्याच सामन्यात ब्रेंडन मॅक्क्युलमने शतक झळकावले.

 असे आहेत दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (क), इशान किशन (डब्ल्यूके), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

पहा व्हिडीओ


हेही वाचा:

अजिंक्य रहाणेला संघात घेण्यासाठी स्वतः धोनीने दिला होता खास सल्ला; चेन्नई सुपर किंग्सच्या मालकाने केला मोठा खुलासा..!

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.