RR vs DC: पहिल्याच षटकात यशस्वी जयसवालने ठोकले 5जबरदस्त चौकार, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
RR vs DC: पहिल्याच षटकात यशस्वी जयसवालने ठोकले 5जबरदस्त चौकार, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
RR vs DC: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकापासून शानदार फलंदाजी केली. जैस्वालने पहिल्याच षटकात पाच शानदार चौकार लगावले.
पहिल्याच षटकात ठोकले पाच चौकार.

यशस्वी जैस्वालने चौकार मारून सामन्याची सुरुवात केली. त्याने खलील अहमदच्या चेंडूवर अप्रतिम शॉट घेतला. यानंतरही त्याची बॅट थांबली नाही तोच जयस्वालने एकापाठोपाठ पाच चौकार मारले. त्यामुळे राजस्थानला पहिल्याच षटकापासून चांगली सुरुवात झाली.
राजस्थान रॉयल्सने यापूर्वीचा सामना गमावला आहे. अशा स्थितीत आज संघाला विजय मिळवायचा आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सनेही पहिले दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे दिल्लीलाही विजयाच्या ट्रॅकवर परतायला आवडेल. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर शानदार फलंदाजी करत आहेत.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन):
डेव्हिड वॉर्नर (क), मनीष पांडे, रिले रॉसौ, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (वा.), एनरिक नोर्टजे, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
1-2 ka 4, 4-2 ka bhi 4 – Yashaswi Jaiswal is dealing in boundaries only! #IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @rajasthanroyals pic.twitter.com/9EE0BmtnxB
— JioCinema (@JioCinema) April 8, 2023
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c/wk), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.