यशस्वी जयसवाल : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सलामीवीर यशस्वी जयसवालने शानदार द्विशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात त्याने 209 धावांची खेळी खेळली. मात्र, आता द्विशतक झळकावल्यानंतर टीम इंडियाच्या तीन खेळाडूंची कसोटी कारकीर्द कायमची उद्ध्वस्त होऊ शकते. जयस्वालच्या उपस्थितीत या तीन खेळाडूंना भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार असल्याचे मानले जात आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू..
पृथ्वी शॉ
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियापासून दूर आहे. खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून वगळावे लागले. मात्र, आता यशस्वी जयसवालच्या द्विशतकानंतर शॉचे कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण झाले आहे. शॉ भारतासाठी कसोटीत सलामीच्या फलंदाजाची भूमिकाही बजावत असे, परंतु खराब कामगिरीमुळे शॉला भारतीय संघातून बाहेर केले गेले. सध्या तो रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये सहभागी होत आहे.
ईशान किशन
भारतासाठी आतापर्यंत दोन कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या इशान किशनने 2023 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी पदार्पण केले होते. यानंतर त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली असली तरी मानसिक थकव्याचे कारण देत त्याने आपले नाव मागे घेतले. यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेतून त्याचे दुर्लक्ष झाले. मात्र, आता जयस्वालच्या द्विशतकामुळे त्याचे पुनरागमन कठीण होणार आहे. ईशानकडे कसोटी फॉरमॅटमध्ये भारताचा सलामीवीर म्हणून पाहिले जात होते, पण यशस्वीने आता या गोष्टींना पूर्णविराम दिला आहे.
रुतुराज गायकवाड
IPL 2023 मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, सलामीवीर रुतुराज गायकवाडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या 2-कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली. मात्र, या दौऱ्यात गायकवाड ला भारताकडून एकही कसोटी सामना खेळण्याची संधी देण्यात आली नाही. आता त्यांचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. जयस्वालच्या उपस्थितीत त्याला सलामीवीर म्हणून कसोटी संघात सामील होणे कठीण झाले आहे. यशस्वीची कारकीर्द आणि फोर्म पाहता तो या सर्व खेळाडूंपेक्षा जास्त वरचढ ठरत आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता