6,4,0,2,4,6… रणजी ट्रॉफीमध्ये यशस्वी जयसवाल घालतोय धुमाकूळ, जबरदस्त षटकार ठोकत पूर्ण केले शतक तर कुटल्या तब्बल इतक्या धावा? टीम इंडियात मिळणार संधी?…
सध्या देशभरात रणजी ट्रॉफीची जबरदस्त क्रेझ सुरु आहे. याच सामन्याच्या मालिकेतून भारतीय संघाचे युवा खेळाडू तयार होत असतात. टीम इंडियात निवड होण्यासाठी आधी तुम्हाला रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताफ अली मध्ये आणि आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागते.
आजच्या दिवशी रणजी ट्रॉफीमध्ये एका बाजूला मुंबईआणि हैद्राबाद यांचा सामना रंगला आहे. हैद्राबादच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय थोड्या वेळासाठी का होईना खरा ठरला आणि मुंबईला पृथ्वी शो च्या रूपाने पहिला झटका बसला.
त्यानंतर मात्र मुंबई संघाने जबरदस्त फलंदाजी चा नजारा पेश करत पहिला दिवस संपेपर्यंत तब्बल 425 धावा कुटल्या ,यादरम्यान केवळ 3 विकेट मुंबईने गमावल्या. सलामीवर पृथ्वी शो फक्त 19 धावा करून बाद झाला. मात्र त्याच्यानंतर दुसरा सलामीवीर युवा खेळाडू यशस्वी जयसवाल याने जबरदस्त फलंदाजी करत सुर्यकुमार यादव सोबत 176 धावांची पार्टनरशिप केली. सुर्यकुमार 90 धावा करून बाद झाला.
त्यांतर फलंदाजीस आलेला कर्णधार अजिक्य राहणे देखील जबरदस्त फोर्म मध्ये दिसला. यशस्वी आणि अजिक्य यांनी तिसऱ्या विकेट साठी 210 धावांची पार्टनरशिप केली.
यशस्वी जयसवालने पूर्ण केले आपले शतक..
यादरम्यान सलामीवीर यशस्वी जयसवालने शानदार शतक साजरे केले. त्याने शानदार 162 धावा ठोकल्या. त्यानंतर मात्र तो मिकी जयसवालच्या गोलंदाजीवर बाद झाला. परंतु त्याच्या धावांच्या सहाय्याने मुंबई चांगल्या स्कोरपर्यंत पोहचली असून,अजूनही त्यांच्याकडे 7 विकेट बाकी आहेत.
मुंबई कडून सुर्यकुमार यादव 90 धावा , पृथ्वी शो 19 धावा ,सलामीवीर यशस्वी जयसवाल 162 धावा काढल्या तर कर्णधार अजिंक्य रहाणे 126 धावा काढून आणि सर्फराज खान नाबाद 21 धावा करून खेळत आहेत.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबई चांगल्या स्थितीत पोहचून 3 बाद 425 धावा असा तगडा स्कोर उभारू शकली आहे.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…