IND vs NZ LIVE: फिन ऍलनला बोल्ड करताच यजुवेंद्र चहलने रचला इतिहास, T-20 च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय गोलंदाज..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज लखनौच्या मैदानावर खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार सेंटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून गोलंदाज यजुवेंद्र चहलने न्यूझीलंडला पाहिला धक्का दिला.
युझवेंद्र चहलने पहिल्या ओव्हरमध्ये येताच न्यूझीलंडला पहिला धक्का दिला आहे. त्याने सलामीवीर फिन ऍलनला क्लीन बोल्ड करून किवी संघाला पहिला धक्का दिला. यासोबतच चहलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

चहलने भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट मिळवण्याचा बहुमान आपल्या नावावर केला आहे. या सामन्याच्या आधी भुवनेश्वर कुमारच्या नावावर हा विक्रम होता. भुवनेश्वरने 74 टी-20 सामने खेळून त्यात 90 विकेट घेतले होते. तर दुसरीकडे चहल सुद्धा याच आकड्यावर होता.
मात्र आज न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पहिलेच षटक टाकण्यास आलेल्या चहलने न्यूझीलंडचा सलामीवीर ‘फिन ऍलन’ ला बोल्ड करत भारतीय संघाकडून सर्वांधिक टी-20 विकेट घेण्याच्या मान मिळवलाय. सध्या चहल 91 विकेत्य घेऊन या यादीत सर्वांत वर आहे.
Bhuvi
Why not in Indian team now?
T20 wc me khraab chala. To aise to bahut khiladi the jo fail hue ….sirf bhuvi ko hi drop kyu kiya @BhuviOfficial ✨ @BCCI #INDVsNZT20 https://t.co/MgmzoWEvKf— Realyk (@YOGESHK84241181) January 29, 2023
चहल पाठोपाठ भुवनेश्वर,अश्विन, हार्दिक पंड्या,जडेजा, कुलदीप यादव यांचा नंबर लागतो. हे सर्व गोलंदाज 80 विकेट्सच्या वर विकेट घेऊन या यादीत सहभागी आहेत.
हे ही वाचा..
दुसऱ्या टी -२० साठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हेन,’या’ २ खेळाडूंना मिळणार डच्चू