अत्यंत कमी वयात असतांना या ४ खेळाडूंनी देशाच्या संघाचे कर्णधार पद सांभाळलय..
क्रिकेट चे वेड हे जगभर आहे हे आपणास माहीतच आहे प्रत्येक देशात क्रिकेट खेळाचे चाहते असतात. या लेखात आम्ही आपणास अश्या खेळाडू बद्दल माहिती देणार आहोत की ज्यांनी अगदी लहान वयात देशाच्या क्रिकेट टीम चे कॅप्टन पद सांभाळले आहे. त्याचे वय ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही.

तसे म्हंटले तर प्रत्येक खेळाडू चे स्वप्न असते की आपल्याला आपल्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी परंतु ही संधी अगदी थोड्याच खेळाडूंना मिळते. या साठी गरजेचा आहे तो म्हणजे अनुभव, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला खेळाडू असणे गरजेचे आहे.
राशिद खान:-
राशिद खान हा अफगाणिस्तान च स्टार खेळाडू आहे. राशिद खान हा एक गोलंदाज आहे. स्पिनर गोलंदाजी मुळे राशिद खान हा नेहमी चर्चेत असतो. राशिद खान ने चक्क 19 वर्ष 165 दिवसाच्या काळात अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. आतापर्यंत सर्वात कमी वयात क्रिकेट संघाचा कॅप्टन राशिद खान ची ओळख आहे.
राजिन सालेह:-
हा सुद्धा बांगलादेश क्रिकेट संघाचा माझी खेळाडू आहे. राजिन सालेह ने सुद्धा वयाच्या 20 वर्ष 297 दिवसाच्या काळात अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व स्वीकारले होते.
अंशुमन रथ:-
अंशुमन रथ हा हाँगकाँगचा खेळाडू आहे अंशुमन रथ या खेळाडूने अवघ्या वयाच्या 20 वर्षे आणि 315 दिवसात हाँगकाँग देशाच्या क्रिकेट संघाचे कॅप्टन पद सांभाळले होते.
तातेंडा तैबू:-
हा झिम्बाब्वेचा देशाचा खेळाडू आहे. ततेंडा तैबू याने आपल्या वयाच्या अवघ्या 20 वर्षे 342 दिवसांत झिम्बाब्वे वन डे सामना संघाचे नेतृत्व केले होते.
उत्कर्ष उत्सया:-
उत्कर्ष उत्सया हा झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आहे उत्कर्ष उत्सया याने वयाच्या अवघ्या 21 वर्षे 125 दिवसात आपल्या देशाच्या संघाचे नेतृत्व केले होते तसेच देशासाठी आणि अनेक सामन्यांमध्ये उत्कर्ष उत्सया याने मोलाची कामगिरी केली आहे.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..