धनश्री वर्मा: टीम इंडियाचा वेगवान फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलसाठी अलीकडचा काळ चांगला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही तो भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र आता त्याची पत्नी धनश्री वर्मासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
धनश्री वर्माला मिळालाय तिचा पहिला चित्रपट, मुख्य अभिनेत्री म्हणून करणार लीड?
धनश्री वर्मा चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. ती तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘आकाश दाती वस्तव’ असे तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. दिल राजूच्या प्रोडक्शन अंतर्गत बनत असलेला हा चित्रपट नृत्याशी संबंधित आहे.
अशा परिस्थितीत धनश्रीसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी ठरू शकते. तिचे नृत्यकौशल्य आणि आकर्षक अभिनयामुळे तिची या चित्रपटासाठी निवड झाली आहे. मात्र धनश्रीचा हा चित्रपट हिट ठरला तर ती युजवेंद्र चहलकडे दुर्लक्ष करू शकते, असे मानले जात आहे.
धनश्री वर्माने केलीय शुटींगला सुरवात, काही महिन्यातच चित्रपट होणार तयार.!
धनश्रीने तिच्या चित्रपटाचे काही सीन्स मुंबईत शूट केले आहेत आणि लवकरच ती हैदराबाद लोकेशनमध्ये शूट करणार आहे. हा चित्रपट ससी कुमार मुतुलुरी दिग्दर्शित करत आहेत. हाही त्याचा डेब्यू प्रोजेक्ट आहे. याशिवाय दक्षिण भारतात खूप प्रसिद्ध असलेल्या कार्तिकने चित्रपटाचा पार्श्वसंगीत संगीतबद्ध केला आहे.
युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्माचे नाते नेहमी चर्चेत असते.
दुसरीकडे, युझवेंद्र चहल देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. रणजी ट्रॉफीनंतर तो आजकाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणासाठी खेळत आहे. शनिवारी झालेल्या मेघालयविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 बळी घेत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा स्थितीत रविवारी होणाऱ्या आयपीएल मेगा लिलावात त्याला जास्त किंमत मिळण्याची शक्यता बळावली आहे.
हे ही वाचा:-
IPL 2025: यंदा च्या सिझन मध्ये ठरणार हा सर्वात महागडा खेळाडू, हरभजन सिंग ने केली भविष्यवाणी.
PL 2025: रोहित शर्मा RCB मध्ये सामील होणार? AB डिविलियर्सचं विधान.