लोकसभा निवडणूक 2024च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पक्षाकडून क्रिकेटपटू युसुफ पठाण यांना गुजरात मधून निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र या दरम्यान निवडणूक आयोगाने युसुफ पठाण याला चांगलेच खडे बोल सोनावले आहे.
युसुफ पठाणणे प्रचारादरम्यान 2011 विश्वचषक स्पर्धेतील फोटोचा वापर केला आहे. या फोटोमध्ये युसूफ पठाण सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर घेऊन मैदानात फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने या फोटोवर आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने युसुफ पठाण याला चांगलेच फटकारले आहे.
युसुफ पठाणने फोटोमध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा बॅनर मध्ये वापर केला आहे. ज्यावर काँग्रेसने 26 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. 2011 साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी युसुफ पठाण हा भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. युसुफ पठाण हा इरफान पठाण याचा मोठा भाऊ आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सीईओ म्हणाले की, “काँग्रेस पक्षाकडून आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत 2011 वनडे विश्वचषकातील भारताच्या विजयाचा फोटो प्रचाराच्या बॅनर मधून हटवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. विश्वचषक जिंकण्याचा क्षण हा खूपच भावनिक करणारा आहे. त्याचा वापर निवडणुकीच्या कामात होता कामा नये यासाठी तो फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.”
निवडणूक आयोगाने माजी क्रिकेटपटूला 2011 विश्व चषकातील भारतीय विजयाच्या संबंधित सर्व फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. काँग्रेसने मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर पठाणणे प्रतिक्रिया दिली आहे की, “विश्वचषकाच्या संबंधित फोटो वापरण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे कारण मी या विजयी संघाचा सदस्य आहे.”
काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी त्यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण याला उमेदवारी दिली होती. युसुफ पठाण आता तृणामल काँग्रेसकडून बहरामपूर येथून लोकसभा निवडणूक लढणार आहे. 2007 टी20 विश्वचषक स्पर्धा आणि 2011चा वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य आहे.
युसुफ पठाण हा गुजरात येथील बडोद्याचा रहिवासी आहे. या निवडणुकीमध्ये आता त्याला काँग्रेसचा उमेदवार अधीर रंजन चौधरी यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची कारकिर्द फार छोटीशी राहिली आहे. त्याने भारतीय संघाकडून 57 वनडे आणि 22 टी20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. युसूफ पठाणने 57 वनडे सामन्यांमध्ये 810 दावा तर टी 20 मध्ये 236 धावा केल्या आहेत. अष्टपैलू असलेल्या या खेळाडूने वनडे मध्ये 33 तर टी 20 मध्ये 13 बळी घेतले होते. 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
पठाणची आयपीएल मध्ये कामगिरी जबरदस्त राहिली आहे. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने आयपीएल चषक जिंकला होता. त्यावेळी तो त्या विजेत्या संघाचा सदस्य होता. तसेच केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएलचा चषक जिंकला होता. त्या विजेत्या संघाचा सदस्य आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.