- Advertisement -

केवळ युवराजच नाही तर या 2 धाडसी फलंदाजांनीही T20 क्रिकेटमध्ये 12 चेंडूत अर्धशतक झळकावले, एकाने 6 चेंडूत 6 षटकार ठोकले.

0 0

 

आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे मोठे वेड आहे अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. क्रिकेट आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या भारतीय क्रिकेट संघ जगात सर्वात कठीण संघापैकी समजला जातो. तसेच आपल्या क्रिकेट संघातील असे काही खेळाडू आहेत त्यांचा डंका पूर्ण जगभर वाजत आहे.

 

क्रिकेट मद्ये चांगला परफॉर्मन्स आणि रेकॉर्ड ही खूप महत्त्वाची असतात. प्रत्येक फलंदाज वेगवेगळी रेकॉर्ड बनवत असतो तरी काही जुनी रेकॉर्ड मोडून आपले नाव कोरत असतो. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या 2खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी केवळ 12 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले आहे तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज फलंदाज.

 

 

2007 साली इंग्लंड विरुद्ध झालेला T 20 सामन्यात युवरासिंग ने 12 चेंडूत अर्धशतक करून इंग्लंड संघातील गोलंदाजी ची चांगलीच धुलाई केली होती. तसेच याच सामन्यात युवराज सिंग ने 6 चेंडूत 6 षटकार लावण्याचा विक्रम केला आहे. युवराज सिंग बरोबर असे 2 खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा 12 चेंडू मध्ये अर्ध शतक करण्याचा विक्रम केला आहे.

 

12 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही वेस्ट इंडिजचा अनुभवी आणि आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर सुद्धा आहे. बिग बॅश लीगमध्ये त्याने हा विक्रम केला. मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना गेलने 12 चेंडूत अर्धशतकझळकावले. 2016 मध्ये त्याने हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. या सामन्यात या अनुभवी फलंदाजाने 17 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. तरीही ख्रिस गेलच्या संघाला हा सामना जिंकता आला नाही.

 

 

त्याचबरोबर अफगाणिस्तानचा फलंदाज हजरत उल्लाह ने झझाईनेही टी-20 क्रिकेटमध्ये 12 चेंडूत अर्धशतक झळकावले. अफगाणिस्तान प्रीमियर लीग 2018 मध्ये त्याने हा पराक्रम केला. त्याच्या फलंदाजीने मैदान गाजवले त्याच्या फलंदाजीने मैदानावर वादळ निर्माण केले होते. युवराजप्रमाणेच त्यानेही 12 चेंडूत सहा षटकार मारून अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. 17 चेंडूत त्याने 7 षटकार आणि 4 चौकार लगावले. आणि 12 चेंडूत अर्धशतक झळकावले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.