“टी-20 मध्ये सर्वांत जलद अर्धशतक ते एका सीजनमध्ये सर्वांत जास्त हॅटट्रिक” टीम इंडियाचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहच्या नावावर आहेत हे 5मोठे विक्रम, आजपर्यंत कोणताही खेळाडू करू शकला नाही बरोबरी..
भारतीय क्रिकेट संघाची शान म्हटला जाणारा युवराज सिंग त्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता. युवराज सिंगला ‘सिक्सर किंग’ म्हणूनही ओळखले जाते. 2007 T20 विश्वचषक (T20 WC) आणि वर्ष 2011 (ODI WC 2011) मध्ये टीम इंडियाच्या विजयात माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो ‘ऑलराउंडर’ आणि ‘टॉप क्लास’ खेळाडू होता.
View this post on Instagram
युवराज सिंगने ICC U-19 विश्वचषक 2000, IPL 2016 आणि 2019, रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आणि अबू धाबी T10 लीग 2019 जिंकले आहेत. आज आम्ही युवराज सिंगच्या अशा पाच विश्वविक्रमांबद्दल सांगणार आहोत, जे आतापर्यंत कोणताही क्रिकेटर करू शकला नाही.
1) T20 मधील सर्वात वेगवान अर्धशतक:
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मधल्या फळीत येत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले, हे अवघड काम आहे, पण युवराज सिंगने हा पराक्रम केला आहे. युवराज सिंगने T20 विश्वचषक 2007 च्या सुपर 8 सामन्यात इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. जे फक्त 12 चेंडूत केले होते.

2) पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक एकदिवसीय शतके:
युवराज सिंगने आणखी एक विश्वविक्रम रचला. ज्यामध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत वनडेमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे, त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सात शतके झळकावली आहेत.
3) सर्वाधिक ICC फायनल खेळण्याचा विक्रम:
दुसरीकडे, याशिवाय आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराज सिंग सात वेळा आयसीसी फायनलमध्ये पोहोचला आहे.
4) तीनही आयसीसी ट्रॉफी बाद फेरीतील सामन्यातील सामनावीर:
युवराज सिंगने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, ICC विश्वचषक आणि ICC T20 विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीत खेळताना सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. एवढी मोठी कामगिरी करणारा युवराज सिंग हा एकमेव खेळाडू आहे.
5) 1 हंगामात सर्वाधिक हॅटट्रिक:
एक चांगला आक्रमक फलंदाज असण्यासोबतच युवराज सिंग हा एक यशस्वी डावखुरा फिरकी गोलंदाजही होता. IPL 2009 मध्ये, युवराज सिंगने ‘किंग इलेव्हन पंजाब’ कडून खेळताना दोन हॅटट्रिक्स घेतल्या, जो 1 IPL हंगामात सर्वाधिक हॅटट्रिक करण्याचा विक्रम आहे.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…