“सचिनच्या या एका सल्ल्यामुळे भारताने विश्वचषक 2011 जिंकला होता” टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केला मोठा खुलासा..

0
28

“सचिनच्या या एका सल्ल्यामुळे भारताने विश्वचषक 2011 जिंकला होता” टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केला मोठा खुलासा..


आयसीसीची सर्वांत मोठी क्रिकेट स्पर्धा असलेला (World cup 2023) येत्या काही दिवसात सुरु होत आहे.  भारतीय संघ स्वतः यावर्षीच्या विश्वचषकाचा यजमान असल्यामुळे संघाकडे यार्शी विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे. याआधी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला होता तेव्हापासून भारतीय संघ एकसुद्धा विश्वचषक जिंकू शकला नाहीये. यावर्षी विश्वचषक जिंकून चाहत्यांना खुश करण्याची चांगली संधी रोहितकडे आहे.

मात्र सध्या रोहितच्या संघापेक्षा जास्त 2011 च्या वर्ल्डकप विजेता संघाची चर्चा होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

2011 विश्वचषकाचा भाग असलेल्या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेतील भारताच्या मोहिमेबाबत आजपर्यंत अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, सध्या टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने (Yuvraj Singh) आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. युवराज सिंगने 2023 विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच हा खुलासा केला आहे.

2011 च्या विश्वचषक विजयात युवराज सिंगची(Yuvraj Singh) भूमिका महत्त्वाची होती. त्या स्पर्धेत त्याने बॉल आणि बॅटने चमकदार कामगिरी केली. युवराजला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. युवराजच्या या वक्तव्याने आता सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत.

"सचिनच्या या एका सल्ल्यामुळे भारताने विश्वचषक 2011 जिंकला होता" टीम इंडियाचामाजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केला मोठा खुलासा..
“सचिनच्या या एका सल्ल्यामुळे भारताने विश्वचषक 2011 जिंकला होता” टीम इंडियाचामाजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केला मोठा खुलासा..

सचिनच्या एका सल्ल्यामुळे टीम इंदियाने वर्ल्डकप जिंकल्याचे वक्तव्य युवराज सिंगने केलंय.

भारताला ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्याने मोठा धक्का बसला. या पराभवानंतर मीडियाने भारतीय संघावर जोरदार टीका केली. त्या तणावपूर्ण परिस्थितीत क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin tendulkar) भारतीय संघाची धुरा सांभाळली. बाकी खेळाडूंचे लक्ष विचलित करू नका असा सल्ला त्याने संपूर्ण संघाला दिला. दरम्यान, युवराज सिंगला आता हाच सल्ला आठवला असून त्याने सचिनची स्तुती करत संघाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.

सचिनच्या एका सल्ल्याने भारताने २०११ चा विश्वचषक जिंकला होता-युवराज सिंग

एका कार्यक्रमात बोलतांना युवराज म्हणाला की,

 

“दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतरआम्ही खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो. पण आमच्या मनात सतत असे विचार येत होते की  हा सामना आम्ही जिंकायला हवा होता.  त्यानंतर मिडीयाने संघावर बऱ्याच टीका केल्या सर्वाविषयी वाईट-साईट गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या तेव्हा सचिन संघासाठी धावून आला होता.  सचिन टीमसोबत बसला आणि म्हणाला, टीव्ही पाहणे बंद करा, वर्तमानपत्र वाचणे बंद करा.   फक्त विश्वचषकावर लक्ष केंद्रित करा. संघाने त्याच्या सल्ल्याशी सहमती दर्शविली आणि  त्याचे पालन केले "सचिनच्या या एका सल्ल्यामुळे भारताने विश्वचषक 2011 जिंकला होता" टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केला मोठा खुलासा...

युवराज पुढे म्हणाला, “भारताची समस्या ही आहे की, लोकांना वाटते की फक्त भारतीय संघच जिंकेल. हा एक मोठा विश्वचषक आहे, तेथे बरेच चांगले संघ आहेत आणि आम्हाला खरोखर आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करावे लागेल.” त्यामुळे कधीही संघावर दडपण येईल आणि त्यांची मानसिक खच्चीकरन होऊन कामगिरी  खालावेल , असे विधान कार्य कुणीही करू नका असेही युवी म्हणाला.


हेही वाचा:

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here