बुमराहच्या अनुपस्थितीत चहलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! ‘हा’ मोठा विक्रम मोडण्यापासून केवळ १ विकेट दूर

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी -२० मालिका आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. दोन्ही संघ सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे अंतिम सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. मालिकेतील अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे युझवेंद्र चहलच्या फिरकी गोलंदाजीची जादू या मैदानावर पाहायला मिळू शकते. दरम्यान युझवेंद्र चहलकडे जसप्रीत बुमराहचा एक मोठा विक्रम तोडण्याची संधी असणार आहे.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो सध्या फिटनेस मिळवण्यासाठी एनसीएमध्ये मेहनत करतोय. तर युझवेंद्र चहलला पहिल्या टी -२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात उमरान मलिकच्या ऐवजी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. या सामन्यात २ षटक गोलंदाजी करत त्याने ४ धावा खर्च करत १ गडी बाद केला होता.

हा विक्रम मोडण्याची संधी..
सध्या न्यूझीलंड संघाविरुद्ध टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम, हा जसप्रीत बुमराहच्या नावे आहे. बुमराहने १० सामन्यांमध्ये १२ गडी बाद केले आहेत. हा विक्रम युझवेंद्र चहल तोडू शकतो. युझवेंद्र चहलने आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये ११ गडी बाद केले आहेत. त्यामुळे तिसऱ्या टी -२० सामन्यात त्याला २ गडी बाद करण्यात यश आले,तर न्यूझीलंड संघाविरुद्ध टी -२० सामना खेळताना सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज ठरेल.
हे ही वाचा..
‘भारतीय संघात काही संधी मिळेना..’ आता अजिंक्य रहाणे खेळणार ‘या’ देशासाठी..
‘करो या मरो’ सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे ३ महत्वाचे बदल! अशी असू शकते प्लेइंग ११