IPL 2024: रोहित शर्मा च्या नावी लज्जास्पद रेकॉर्ड, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज.

0

 

आयपीएल मुळे भारतीय क्रिकेट संघात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. आयपीएल मुळे देशातील युवा खेळाडूंना क्रिकेट मध्ये संधी मिळत आहे शिवाय आपल्या देशाला उत्कृष्ठ फलंदाज आणि गोलंदाज मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. आयपीएल मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वात कठीण क्रिकेट संघ समजला जातो हे सर्व शक्य आयपीएल मुळेच झाले आहे.

 

रोहित शर्मा
रोहित शर्मा

आपल्या देशात अनेक दिग्गज क्रिकेटर आहेत त्यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, रोहित शर्मा, आश्विन, महेंद्रसिंग धोनी या दिग्गज खेळाडू च्या नावी अनेक दिग्गज रेकॉर्ड आहेत. जी रेकॉर्ड देशातील किंवा जगातील कोणताच खेळाडू मोडू शकत नाही. परंतु भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा च्या नावी आयपीएल दरम्यान एक लज्जास्पद रेकॉर्ड नावी झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिक बरोबर अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत रोहित शर्मा हा एकूण १७ वेळा शून्य धावांवर बाद झाला आहे.

रोहित शर्मा
रोहित शर्मा

 

वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्स संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचं निर्णय घेतला. शिवाय मुंबई इंडियन्स ची सुरुवातीची इनिंग खूपच खराब गेली. मुंबई इंडियन्स संघातील टॉप 3 फलंदाज रोहित शर्मा शिवाय नमन धीर आणि देवाल्ड ब्रेविस हे 0 धावांवर बाद झाले.

 

 

रोहित शर्माच्या नावावर शर्मनाक रेकॉर्ड:-

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा च्या नावी हा लज्जास्पद रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा बरोबर दिनेश कार्तिक 17 वेळा शून्य धावांवर आऊट झाला आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा 15 वेळा शून्य धावांवर बाद झाला आहे.

 

 

या यादीत या दिग्गज खेळाडूंचा सुद्धा समावेश:-

आत्तापर्यंत आयपीएल इतिहासात पीयूष चावला 15 वेळा आयपीएल सामन्यांमध्ये एकही धाव न काढता बाद झाला आहे. याशिवाय मनदीप सिंग आणि सुनील नरेनही प्रत्येकी १५ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. मुंबई इंडियन्स संघा व्यतिरिक्त रोहित शर्मा आयपीएलमध्ये डेक्कन चार्ज या संघामध्ये सुद्धा खेळाला आहे. दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात या संघांमध्ये सुद्धा खेळला आहे.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.