IPL 2025 Timetable: यंदा बदलणार आयपीएल सामन्याची वेळ आणि तारिख? या दिवशी जाहीर होऊ शकते आयपीएल 2025 चे वेळापत्रक..

IPL 2025 Timetable: क्रिकेट चाहते आयपीएल सीझन-१८ (IPL 2025) ची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी बहुतेक संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. ज्याबाबत आरसीबीने आपला नवीन कर्णधारही जाहीर केला आहे. रजत पाटीदार आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीचे नेतृत्व करणार आहे. आता, स्पर्धेच्या तारखेबाबत एक मोठी अपडेट आली आहे. अहवालानुसार, पूर्वी आयपीएल २०२५ २३ मार्चपासून होणार होते, परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे.
या दिवशी होणार आयपीएल २०२५ ला सुरुवात?
Sports Wordz च्या रिपोर्टनुसार, आयपीएल २०२५ सीझन-१८ २२ मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात खेळला जाईल. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन येथे खेळला जाईल.
आयपीएलच्या संपूर्ण वेळापत्रकाबाबत बऱ्याच काळापासून अंदाज लावले जात होते, परंतु बीसीसीआयने अद्याप स्पर्धेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. तथापि, बोर्डाने सर्व सामन्यांच्या तारखा फ्रँचायझींसोबत शेअर केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल.
IPL 2025 Timetable: IPL 2025 ची तारीख बदलणार?
यापूर्वी, स्पर्धेच्या सुरुवातीबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी संकेत दिले होते की, सीझन-१८ २३ मार्च रोजी सुरू होऊ शकतो, परंतु आता स्पर्धा सुरू होण्याची तारीख बदलण्यात आली आहे. अहवालानुसार, प्रसारकांनी २२ मार्चपासून स्पर्धा सुरू करण्याची विनंती केली आहे. आता लवकरच बीसीसीआय आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करू शकते.
OPENING MATCH OF IPL 2025.
– RCB set to take on KKR on 22nd March at the Eden Gardens. (Cricbuzz). pic.twitter.com/yO8qz969tp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 13, 2025
यावेळी आयपीएलचे सामने धर्मशाळा आणि गुवाहाटी येथेही खेळवले जातील. याशिवाय, ते मुंबई, चेन्नई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, लखनऊ, जयपूर, कोलकाता, हैदराबाद आणि मुल्लानपूर येथे खेळवले जातील.
हेही वाचा: