DC vs LSG: आयपीएल २०२५ चा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आणि लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्यात खेळला जात आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे ,कारण स्टार फलंदाज केएल राहुलने वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राहुल गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता, परंतु संघाने त्याला सोडले यानंतर, दिल्ली कॅपिटल्सने त्याला लिलावात त्यांच्या संघात समाविष्ट केले.
केएल राहुल पहिला सामना DC vs LSG का खेळत नाहीये?
क्रिकबझच्या वृत्तानुसार, केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. रविवारी राहुलला माहिती मिळाली की, अथिया कधीही आई होऊ शकते. त्यामुळे त्याने पहिल्या सामन्यात रजा घेऊन पत्नीसोबत राहण्याचे ठरवले आहे.
Delhi Capitals Batsman Kl Rahul missed the first match against LSG,
Due to family reasons, His wife Athiya Shetty
likely to Welcome her first Child Soon. – Reports#LSGvsDC #KaranKundrra #KLRahul #OnlineIPLBetting #VigneshPuthur #RishabhPant pic.twitter.com/MwRPDlhxh5— Sports Mafia (@SportsMafia22) March 24, 2025
अशा परिस्थितीत, त्याने दिल्ली कॅपिटल्स (डीसी) संघ व्यवस्थापनाकडून परवानगी घेतली आणि रात्री मुंबईत परतला. तथापि, राहुल ३० मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.
लिलावापूर्वी, लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने केएल राहुलला संघातून सोडले. यानंतर, जेद्दाह येथे झालेल्या मेगा लिलावात, दिल्ली कॅपिटल्स (डीसी) ने १२ कोटी रुपयांची मोठी बोली लावून त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले.
राहुल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि अलिकडेच त्याने दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली. त्याचा आयपीएलमधील आतापर्यंतचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. त्याने १३२ सामन्यांमध्ये ४५.४७ च्या सरासरीने ४,६८३ धावा केल्या आहेत, ज्यात ४ शतके आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा:
LSG vs DC live: अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11