#DCvsLSG : आयपीएल २०२५ सीझन-१८ चा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स( DCvsLSG) यांच्यात खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सने हा रोमांचक सामना 1विकेटने जिंकला. सामन्यात एके ठिकाणी असे वाटत होते की, लखनौ सुपर जायंट्स संघ हा सामना सहज जिंकेल, परंतु आशुतोष शर्माचे करावे तेवढे कौतुक कमी असेल.
आशुतोषच्या स्फोटक खेळीमुळे दिल्लीने हरलेला सामना जिंकला. त्याचवेळी, या सामन्यातील पराभवानंतर, एलएसएलचा कर्णधार ऋषभ पंत यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की सामन्यात संघ कुठे मागे पडला?
6 ball Duck from 27cr player Rishabh Pant
pic.twitter.com/k02pyJuB20
— TukTuk Academy (@TukTuk_Academy) March 24, 2025
#DCvsLSG : पराभवानंतर ऋषभ पंत काय म्हणाला?
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला,
“मला वाटते की आमच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला आणि या विकेटवर खूप चांगली धावसंख्या होती. एक संघ म्हणून आम्हाला प्रत्येक सामन्यातून शिकायचे आहे. आम्हाला सुरुवातीच्या विकेट मिळाल्या, पण आम्हाला माहित होते की ही विकेट फलंदाजीसाठी चांगली आहे. आम्हाला अनेकदा मूलभूत गोष्टी बरोबर ठेवाव्या लागायच्या. मला वाटते की त्यांनी काही चांगल्या भागीदारी केल्या.”
पंत पुढे म्हणाला,
“आम्हाला दबाव जाणवला, या सामन्यात नशीब निश्चितच भूमिका बजावते आणि जर चेंडू मोहित शर्माच्या पॅडला लागला असता तर स्टंपिंगची शक्यता होती. पण क्रिकेटच्या खेळात अशा गोष्टी घडत राहतात, तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही, त्याऐवजी तुम्हाला चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे.”
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून २०९ धावा केल्या. एलएसजीकडून फलंदाजी करताना निकोलस पूरनने ७५ आणि मिचेल मार्शने ७२ धावा केल्या. याशिवाय डेव्हिड मिलरने नाबाद २७ धावा केल्या. यानंतर, दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष्य १९.३ षटकांत ९ गडी गमावून पूर्ण केले. दिल्लीकडून फलंदाजी करताना आशुतोष शर्माने ३१ चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी केली.
हेही वाचा:
LSG vs DC live: अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
1 thought on “#DCvsLSG: हातातील सामना गमावल्यानंतर रिषभ पंतचे मोठे वक्तव्य, सांगितले कुठे झाले चूक..!”