KKRvs RCB Live: आरसीबी आणि केकेआर यांच्यातील पहिला आयपीएल सामना खेळवला जात आहे. नाणेफेक झाले तेव्हा ते आरसीबी कर्णधार रजत पाटीदारने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,. अजिंक्य रहानेच्या केकेआरसंघाला प्रथम फलंदाजी करायची आहे..
KKR vs RCB Live: आरसीबी करणार गोलंदाजी..
आयपीएल २०२४ ट्रॉफी जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्स २०२५ मध्ये त्यांच्या जेतेपदाचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहे. शाहरुख खानच्या संघ केकेआरला या मार्गावर पहिले आव्हान विराट कोहलीच्या आरसीबीकडून येत आहे. आज आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी, केकेआरने कर्णधार बदलला आहे आणि नवीन रणनीती आखण्यास सज्ज आहे.
आज २२ मार्च रोजी, आयपीएल २०२५ ची सुरुवात कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियमवर केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्याने होईल. आरसीबी त्यांच्या पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या शोधात असेल.
आयपीएलचा उद्घाटन सोहळा सुरू झाला आहे. श्रेयाने भूल भुलैय्या मधील ‘आमी…’ या सुपरहिट गाण्याने सुरुवात केली. पुष्पा, भाग मिल्खा भाग आणि कलंक यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या सुपरहिट गाण्यांनी त्यांनी रंगमंचावर आग लावली.
Rajat Patidar said “It feels amazing to lead RCB”. pic.twitter.com/K15l2ygTof
— Johns. (@CricCrazyJohns) March 22, 2025
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटन सामना खेळला जातोय.. हे पहिल्यांदाच आयपीएल २००८ मध्ये घडले, म्हणजेच स्पर्धेच्या पहिल्या हंगामात. तेव्हा केकेआरने मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. २००८ च्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात, ब्रेंडन मॅक्युलमने केकेआरकडून १५८ धावांची तुफानी खेळी केली होती.
RCB breaks the streak early—first toss win at Eden Gardens!
#KKRvsRCB pic.twitter.com/jYT6WWrc9T
— Atul (@tiwariaatul) March 22, 2025
आता १६ वर्षांनंतर, आरसीबी संघ पुन्हा एकदा स्पर्धेतील पहिल्या सामन्यात केकेआरचा सामना करत आहे. २००८ सारखे काहीतरी घडावे असे विराट कोहलीच्या संघाला कधीच वाटणार नाही. दुसरीकडे, अजिंक्य रहाणेचा संघ केकेआर २००८ च्या सामन्याची पुनरावृत्ती करू इच्छितो.
KKR vs RCB Live: असे आहेत दोन्ही संघ (KKR VS RCB playing 11)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
हेही वाचा: