LSG vs DC live: अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

LSG vs DC live: आयपीएल २०२५ चा चौथा सामना आज २५ मार्च रोजी विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स ( LSG vs DC) यांच्यात खेळला जाईल. अक्षर पटेल दिल्लीचा कर्णधार आहे, तर ऋषभ पंत लखनौचा  कर्णधार आहे.

अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ऋषभ पंतचा संघ प्रथम फलंदाजी करेल.

नाणेफेक जिंकल्यानंतर अक्षर पटेल म्हणाला,

“आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. येथे दव पडण्याची शक्यता आहे, आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, म्हणून आम्ही प्रथम गोलंदाजी करत आहोत. मी पंतसोबत आधी खेळलो आहे, तो मला ओळखतो आणि मी त्याला ओळखतो. आम्हाला आमच्या चाली माहित आहेत. मी कॅपिटल्ससाठी खूप खेळलो आहे, आमच्याकडे एक संतुलित संघ आहे. कधीकधी दव पडतो, नेहमीच नाही. मी डीसीसोबत तीन वर्षांपासून आहे. फाफ डु प्लेसिस, स्टब्स, स्टार्क आणि फ्रेझर मॅकगर्क हे आमच्या संघातील चार परदेशी खेळाडू आहेत.”

लखनऊ सुपर जायंट्सचा संघ:

एडेन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई.

LSG vs DC live: अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

दिल्ली कॅपिटल्सचा संघ:

जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.


हेही वाचा:

Shardul Thakur: लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर आता शार्दुल ठाकूरची आयपीएलमध्ये मागच्या दराने इंट्री, या संघाकडून खेळणार आयपीएल 2025

Leave a Comment