Ranji Trophy Delhi vs Railway Live: विराट कोहलीच्या सुरक्षेत मोठी चूक, थेट मैदानात उतरला चाहता आणि विराट सोबत केले असे कृत्य; विडीओ वायरल..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ranji Trophy Delhi vs Railway Live: रणजी ट्रॉफीमध्ये आज दिल्ली आणि रेल्वे यांच्यातही एक सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली देखील खेळत आहे. कोहली १३ वर्षांनी रणजीमध्ये परतला आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. कोहलीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. सर्व चाहत्यांना अरुण जेटली स्टेडियममध्ये मोफत प्रवेश आहे. सामन्यादरम्यान, कोहलीचा एक कट्टर चाहता मैदानात आला.

ImageRanji Trophy Delhi vs Railway Live: विराट कोहलीच्या सुरक्षेत मोठी चूक, थेट मैदानात उतरला चाहता आणि विराट सोबत केले असे कृत्य; विडीओ वायरल..

Ranji Trophy Delhi vs Railway चालू सामन्यात  एका चाहत्याने मैदानात घुसून कोहलीचे पाय धरले

चाहते कोहलीला रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते, आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. कोहली दिल्लीकडून रणजी सामना खेळत आहे. कोहलीची क्रेझ इतकी आहे की पहिल्यांदाच रणजी सामन्यादरम्यान मैदान इतके भरलेले दिसले. सामन्यादरम्यान, विराटचा एक कट्टर चाहता मैदानावर कोहलीजवळ पोहोचला, त्यानंतर हा चाहता कोहलीच्या पाया पडला. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ranji Trophy Delhi vs Railway सामन्यातील पहा वायरल व्हिडीओ.

 

कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

विराट कोहलीची लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अलीकडील कामगिरी खूपच खराब राहिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहलीची कामगिरी फारशी खास नव्हती. या मालिकेत कोहलीने १९० धावा केल्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता या सामन्यात कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.

Ranji Trophy Delhi vs Railway Live: विराट कोहलीच्या सुरक्षेत मोठी चूक, थेट मैदानात उतरला चाहता आणि विराट सोबत केले असे कृत्य; विडीओ वायरल..

Ranji Trophy Delhi vs Railway Live: दिल्ली चा संघ

 

अर्पित राणा, सनत सांगवान, विराट कोहली, यश धुळ, आयुष बदोनी (कर्णधार), प्रणव राजूवंशी (यष्टीरक्षक), सुमित माथूर, शिवम शर्मा, नवदीप सैनी, मणी ग्रेवाल, सिद्धांत शर्मा.

 

दिल्ली आणि रेल्वेच्या सामन्याचे लाईव्ह स्कोर अपडेट येथे पहा:  Ranji Trophy Delhi vs Railway Live Scorecard Update: 


हेही वाचा:

आशा भोसलेची नात नाही तर ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात ‘मिया भाई’ बोल्ड ? मोहम्मद सिराजचे फोटो वायरल..

Leave a Comment