RCB New Captain: विराट कोहली नाही तर ‘या’ खेळाडूकडे सोपवले आरसीबीने कर्णधारपद, आयपीएल 2025 मध्ये करणार संघाचे नेतृत्व..!

RCB New Captain: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुरुवारी आयपीएल २०२५ साठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. आरसीबीचा नवा कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) आहे. आरसीबीने एका विशेष कार्यक्रमात पाटीदारच्या नावाची घोषणा केली. चार वर्षांत त्याचे नशीब उजळले. त्याने २०२१ मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले.
त्याने आतापर्यंत २७ आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७९९ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी ३४.७४ आणि स्ट्राईक रेट १५८.८५ होती. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व केले आहे. आयपीएलचा १८ वा हंगाम पुढील महिन्यात सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी महान क्रिकेटपटू फाफ डु प्लेसिसने गेल्या तीन हंगामात आरसीबीचे नेतृत्व केले. मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने डू प्लेसिसला सोडले होते.
RCB New Captain ची घोषणा केल्यानंतर प्रशिक्षक अँडी फ्लॉवर काय म्हणाले?
आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर म्हणाले, “रजतमध्ये साधेपणा आहे, तो त्याच्या सभोवतालच्या लोकांची काळजी घेतो. त्यांनी मध्य प्रदेशचे नेतृत्व कसे केले हे आम्ही जवळून पाहिले आहे, आम्हाला ते खूप आवडले.
विराट कोहलीने रजत पाटीदार यांना कर्णधारपदी नियुक्त केल्याबद्दल अभिनंदन केले. तो म्हणाला,
“अभिनंदन रजत. तू तुझ्या कामगिरीने आरसीबी चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहेस. मला खात्री आहे की तू फ्रँचायझीला पुढे घेऊन जाशील. तू ते मिळवले आहेस.” तुझ्या नेतृत्वात संघाला एक वेगळी दिशा मिळेल अशी अपेक्षा..
News Title: RCB named Rajat Patidar as a Skipper for IPL 2025
हेही वाचा: