Viral Video: मुंबई इंडियन्स कर्णधार हरमनप्रीत कौरवर मोठी कारवाई, WPL सामन्यात वाद घालणे पडले महागात? बीसीसीआयने काय ठोठावली शिक्षा?

हरमनप्रीत कौर: जाग्भारातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहेत, ज्याचा अंतिम सामना रविवार, ९ मार्च रोजी खेळला जाईल. पण याशिवाय, क्रिकेटचा उत्साह कायम आहे कारण सध्या भारतात महिला प्रीमियर लीग (WPL) खेळली जात आहे. ही स्पर्धा देखील अंतिम टप्प्यात आहे.
पण स्पर्धेच्या मध्यभागी, बीसीसीआयने एका अनुभवी भारतीय खेळाडूवर कारवाई केली आहे, तीही तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी. ही खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्स ची कर्णधार ‘हरमनप्रीत कौर’. होय बीसीसीआयने तिच्यावर काल मोठी कारवाई केली आहे. नक्की काय होते प्रकरण पाहूया सविस्तर..
बीसीसीआयने हरमनप्रीत कौरवर का कारवाई केली?
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू हरमनप्रीत कौर शनिवारी, ८ मार्च रोजी तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. अर्थातच ती तिच्या वाढदिवसाबद्दल खूप उत्साहित असेल आणि साजरा करण्यास तयार असेल. पण त्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, म्हणजे शुक्रवार, ७ मार्च रोजी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तिच्यावर कारवाई केली आणि तिला मोठा दंड ठोठावला आहे. यामागचे कारणही तसेच आहे.
याचे कारण म्हणजे WPL मध्ये मुंबई इंडियन्स आणि UP वॉरियर्स यांच्यात खेळलेला सामना. हा सामना गुरुवार, ६ मार्च रोजी लखनौ येथे झाला, ज्यामध्ये मुंबईने सहज विजय मिळवला. पण या सामन्यात, मुंबई विजयाच्या अगदी जवळ येण्यापूर्वी, असे काही घडले ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. ही घटना UP फलंदाजी करत असतांना १९ व्या षटकात घडली, जेव्हा पंचांनी हरमनप्रीतला सांगितले की तिचा संघ वेळापत्रकापेक्षा मागे धावत आहे आणि त्यामुळे त्यांना ३० यार्ड वर्तुळाबाहेर फक्त ३ क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी असेल.
पहा व्हिडीओ,
— kuchnahi123@12345678 (@kuchnahi1269083) March 6, 2025
मुंबईच्या कर्णधाराला हा निर्णय आवडला नाही आणि तिने पंचांकडे निषेध नोंदवला. दरम्यान, मुंबईची गोलंदाज अमेलिया कारही आली आणि तिने तिचे मत मांडण्यास सुरुवात केली. हे सर्व चालू असतानाच यूपीची फलंदाज सोफी एक्लेस्टोनही तिथे पोहोचली आणि तिने पंचांना या प्रकरणाबद्दल काहीतरी सांगायला सुरुवात केली. पण हरमनप्रीतला सोफीचा हस्तक्षेप आवडला नाही आणि तिने यूपीच्या खेळाडूला काही वाईट गोष्टी सांगितल्या.
बीसीसीआयने हरमनप्रीत कौरला ठोठावला दंड!
त्यावेळी पंचांनी हा प्रश्न सोडवला असला तरी, मुंबईच्या कर्णधाराचे वर्तन पंचांना आणि सामनाधिकाऱ्यांना आवडले नाही. हरमनप्रीतचे वर्तन बीसीसीआयने वर्ल्ड प्रीमियर लीगसाठी ठरवलेल्या आचारसंहितेविरुद्ध असल्याचे आढळून आले आणि मॅच रेफरीने मुंबईच्या कर्णधाराला तिच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावला.
तथापि, हरमनप्रीतसाठी ही दिलासादायक बाब होती की तिच्यावर कोणतीही बंदी घालण्यात आली नाही आणि ती स्पर्धेत खेळत राहील.
हेही वाचा: