WPL 2025, RCBW vs GTW: कुठे मोफत पाहू शकता महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना? आरसीबी आणि जीटी भिडणार..!

WPL 2025, RCBW vs GTW: महिला क्रीडा क्षेत्रातील सर्वांत प्रसिद्ध क्रिकेट लीग महिला प्रीमियर लीग 2025 (WPL 2025) आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला जाईल. यावेळी गुजरात टायटन्स एका नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. तिसऱ्या हंगामाच्या काही दिवस आधी, अॅशले गार्डनरला गुजरात टायटन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
WPL 2025, RCBW vs GTW: तुम्ही सामना मोफत कुठे पाहू शकता? (Where to watch first WPL match?)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील पहिला सामना स्पोर्ट्स १८ वर थेट प्रक्षेपित केला जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होईल. तुम्ही हा सामना JioCinema वर मोफत पाहू शकता. आज फक्त एकच सामना खेळवला जाणार आहे.
यावेळी महिला प्रीमियर लीग २०२५ चे सामने चार शहरांमध्ये होणार आहेत. ज्यामध्ये मुंबई, बेंगळुरू, लखनौ आणि वडोदरा यांचा समावेश आहे.
WPL 2025 साठी गुजरात जायंट्सचा संघ (GT squad for WPL 2025)
अॅशले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी, हरलीन देओल, प्रिया मिश्रा, प्रकाशिका नाईक, काशवी गौतम, डॅनिएल गिब्सन, भारती फुलमाली, लॉरा वोल्वार्ड, मेघना सिंग, सायली सचरे, मन्नत कश्यप, शबनम शकील, दयालन हेमलता, तनुजा कंवर, सिमरन शेख, डिएंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड.
WPL 2025 साठी आरसीबी संघ (RCB squad for WPL 2025)
स्मृती मानधना (कर्णधार), डॅनी व्याट, रिचा घोष, एलिस पेरी, आशा शोभना जॉय, जोशिता व्हीजे, कनिका आहुजा, सब्बिनेनी मेघना, एकता बिश्त, केट क्रॉस, श्रेयंका पाटील, प्रेमा रावत, जॉर्जिया वेअरहॅम, राघवी बिस्ट, सोफी मोलिनेक्स, सोफी डेव्हाईन, जगरावी पवार, रेणुका सिंग.
हेही वाचा: