IPL 2025 Opening Ceremony: एक दोन नाही तर तब्बल एवढ्या ठिकाणी होणार ओपनिंग सेरेमनी, बीसीसीआयच्या नव्या निर्णयाने चाहत्यांचा आनंद दुप्पट ..!

IPL 2025 Opening Ceremony: आयपीएल २०२५ सीझन-१८ सुरू होण्यासाठी आता फक्त ३ दिवस उरले आहेत. आता बीसीसीआय सीझन-१८ खास बनवण्याची योजना आखत आहे.
ज्यामुळे चाहत्यांना आयपीएलचा उद्घाटन सोहळा एक-दोन दिवसांसाठी नाही तर अनेक दिवसांसाठी पाहता येईल. आयपीएल २०२५ चा उद्घाटन सामना २२ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKR vs RCB) यांच्यात ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल आणि येथून उद्घाटन समारंभ सुरू होईल.
IPL 2025 Opening Ceremony: उद्घाटन समारंभ १३ ठिकाणी होणार?
मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय स्पर्धेच्या सर्व १३ ठिकाणी उद्घाटन समारंभ आयोजित करण्याचे योजित आहे. २२ मार्च रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभाला बॉलिवूडचे सुपरस्टार उपस्थित राहतील. ज्यामध्ये गायिका श्रेया घोषाल आणि अभिनेत्री दिशा पटानी यांचा समावेश आहे.
“आम्हाला स्पर्धेत अधिक रंगत आणायची होती जेणेकरून सर्वत्रचे प्रेक्षक उद्घाटन समारंभाचा आनंद घेऊ शकतील. आम्ही प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय आणि स्थानिक कलाकारांची एक रांग ठेवण्याची योजना आखत आहोत,” असे बीसीसीआय उपाध्यक्ष यांनी म्हटले आहे.
कारण हे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात घडत आहे. म्हणूनच, सामन्यांना अडथळा न आणता स्पर्धा सुरळीत पार पाडता याव्यात यासाठी बीसीसीआय आणि राज्य संघटना एकत्रितपणे काम करत आहेत.
अहवालानुसार, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि इतर खेळाडू कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल २०२५ च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, इतर ठिकाणी होणाऱ्या १२ कार्यक्रमांसाठी इतर कलाकारांशी अंतिम चर्चा सुरू आहे.
आयपीएल २०२५ चे सामने गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि मुल्लानपूर येथेही खेळवले जातील. जे राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज सारख्या संघांचे दुसरे होम ग्राउंड आहे.
2 Comments