IPL Record Most Sixes in IPL Season: आयपीएलच्या 18 व्या हंगामात मोडणार ख्रिस गेलचा सर्वांत मोठा विक्रम? या 5 खेळाडूंपैकी एकजण मोडू शकतो Universal Boss चा विक्रम..!

IPL Record: इंडियन प्रीमियर लीग IPL) चा 18 वा हंगाम म्हणजेच आयपीएल 2025 उद्यापासून सुरु होणार आहे. जगातील सर्वांत मोठ्या या टी-२० स्पर्धेमध्ये चौकार-षटकारांचा इतका पाऊस पडतो की, ४० षटकांच्या सामन्यात ५०० पेक्षा जास्त धावा होतात. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडून ही, एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गेल्या १२ वर्षांपासून अखंड आहे.
ख्रिस गेलच्या या विक्रमाच्या जवळपास अद्याप कोणीही पोहोचलेले नाही. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२५ पूर्वी, या वेळी हा विक्रम मोडला जाईल का, यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आणि जर हा विक्रम यंदा मोडला तर तो कोणता खेळाडू मोडू शकले? यावर एक नजर टाकूया..
IPL Record: ख्रिस गेलचा एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोण मोडू शकेल?
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार (Most Sixes in IPL Season) मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. २०१२ मध्ये वेस्ट इंडिजच्या गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना ५९ षटकार मारले होते. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विक्रम अजूनही कायम आहे.
ख्रिस गेलने या हंगामात स्फोटक फलंदाजी करताना ७३३ धावा केल्या होत्या. त्याच वर्षी त्याने १७५ धावांची नाबाद खेळी खेळली, जी अजूनही आयपीएलमधील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. ख्रिस गेल आता निवृत्त झाला आहे, पण आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार आणि सर्वात लांब खेळीचे त्याचे विक्रम अजूनही अबाधित आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार (Most Sixes in IPL Season) मारण्याचा विक्रम मोडला जाईल का?
T-20 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी सतत वाढत आहे. फलंदाजाच्या कौशल्याव्यतिरिक्त, सपाट खेळपट्टी, लहान मैदान आणि उत्कृष्ट फलंदाजी देखील यात योगदान देतात. २०२३ मध्ये आयपीएलमध्ये ११०० हून अधिक षटकार मारण्यात आले होते, तर २०२४ मध्ये १२६० षटकार मारण्यात आले होते.
२०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने सर्वाधिक ४२ षटकार मारले. जेव्हा ख्रिस गेलचा एका हंगामात ५९ षटकार मारण्याचा विक्रम मोडण्याचा विचार येतो तेव्हा भारतीय दावेदारांमध्ये अभिषेक शर्माचे नाव लगेच लक्षात येते. संजू सॅमसनचाही भारतीय दावेदारांमध्ये समावेश आहे.
विराट कोहलीही एका हंगामात सर्वाधिक षटकार (Most Sixes in IPL Season) मारण्याचा दावेदार!
२०१६ मध्ये विराट कोहली हा सर्वाधिक ३८ षटकार मारणारा फलंदाज होता, पण एका हंगामात त्याच्याकडून ६० षटकारांची अपेक्षा करणे खूप जास्त ठरेल. मात्र तो देखील हे करू शकतो, त्याच्याकडे तेवढी शैली आहे.
रोहित शर्माचे चाहतेही ‘हिटमॅन’ला या शर्यतीत ठेवू इच्छितात पण, त्याचा मागील रेकॉर्ड आत्मविश्वास निर्माण करत नाही. आयपीएलच्या एका हंगामात षटकार मारण्याच्या बाबतीत, सहा वेळा भारतीय फलंदाज आणि ११ वेळा परदेशी फलंदाज अव्वल स्थानावर राहिले आहेत. पण रोहित शर्माचे नाव त्यात नाही.
आंद्रे रसेल, जोस बटलर हे देखील एका हंगामात सर्वाधिक षटकार (Most Sixes in IPL Season) मारण्याचे दावेदार!
वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज आंद्रे रसेल आणि इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर हे क्रिस गेलचा ५९ षटकारांचा विक्रम मोडण्याच्या दावेदारांमध्ये आहेत. केकेआरकडून खेळणाऱ्या आंद्रे रसेलने २०१९ मध्ये ५२ षटकार मारले आहेत. ख्रिस गेलनंतर लीग हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा दुसरा सर्वोच्च विक्रम आहे.
जोस बटलरने २०२२ मध्ये ४५ षटकार मारले. या वर्षी गुजरात टायटन्सकडून खेळणारा बटलर देखील गेलचा विक्रम मोडण्याचा दावेदार आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन आणि सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन हे सुद्धा या यादीमध्ये कायम आहेत.
हेही वाचा: