KKR vs RCB live: केकेआर कडून या दिग्गज गोलंदाजाचे पदार्पण, घातक गोलंदाजी साठी आहे प्रसिद्ध, स्वतः कर्णधार अजिंक्य रहाणे ने दिली टोपी..!

KKR vs RCB live: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १८ व्या हंगामातील पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या हंगामात दोन्ही संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरले आहेत. केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे, तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे.
या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहली आणि सुनील नारायण यांच्यातील रोमांचक लढतीवर असतील. २०१९ मध्ये कोलकाताच्या घरच्या मैदानावर आरसीबी संघाने विजय मिळवला होता, परंतु २०२३ आणि २०२४ मध्ये खेळलेले दोन्ही सामने केकेआरने जिंकले.
KKR vs RCB live: केकेआर कडून दिग्गज गोलंदाजाचे पदार्पण.
आयपीएल २०२५ मध्ये, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनचा (Spencer Johnson) मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघात समावेश करण्यात आला. आता तो आरसीबी विरुद्धच्या सामन्यात केकेआरच्या जर्सीमध्ये पदार्पण करणार आहे. यापूर्वी स्पेन्सर जॉन्सन आयपीएल २०२४ मध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता.
Debut Cap in KKR has been given to Spencer Johnson!
pic.twitter.com/57S2Xo1Rww
— Rokte Amar KKR (@Rokte_Amarr_KKR) March 22, 2025
या सामन्यासाठी केकेआरचे प्लेइंग ११
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
आरसीबीचे प्लेईंग 11
विराट कोहली, फिल साल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल.