KKR vs RCB Preview: आयपीएल 2025 चा पहिला सामना आज रंगणार, केकेआर की आरसीबी कोणाची ताकत जास्त ? पहा संभावित प्लेईंग 11

KKR vs RCB Preview: आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात, आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी ( KKR vs RCB )होणार आहे. केकेआर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मैदानात उतरेल, तर यावेळी आरसीबीची कमान रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. दोन्ही संघ स्टार खेळाडूंनी भरलेले आहेत.पाहूया दोन्ही संघाची ताकत आणि प्लेईंग 11बद्दल.
KKR vs RCB Preview:केकेआरकडे दिग्गज खेळाडूंचा भरणा.!
केकेआरकडे सुनील नरेन, क्विंटन डी कॉक, गुरबाज आंद्रे रसेल आणि रिंकू सिंगसारखे स्फोटक फलंदाज आहेत. त्याचबरोबर संघाकडे कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे यांच्या रूपात अनुभवी फलंदाजही आहेत. संघाने व्यंकटेश अय्यरसाठी २३.७५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
गोलंदाजीत, अँरिक नॉर्टजे केकेआरसाठी वेगाने कामगिरी करताना दिसेल, तर त्याला हर्षित राणा आणि स्पेन्सर जॉन्सनची साथ मिळेल. फिरकी विभागाची जबाबदारी सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांच्या खांद्यावर असेल.
KKR vs RCB Preview: आरसीबीकडे गोलंदाजीची कमतरता कायम?
आरसीबीने या हंगामात एक संतुलित संघही निवडला आहे. संघाकडे वरच्या फळीत विराट कोहलीचा अनुभव आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी फिल सॉल्टसारखा मजबूत फलंदाज आहे. रजत पाटीदार, देवदत्त पडिकल आणि कृणाल पंड्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. त्याच वेळी, लियाम लिव्हिंगस्टोन आणि टिम डेव्हिड त्यांच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकतात.
गोलंदाजीत, संघाकडे भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल हे वेगवान त्रिकूट आहेत. मात्र संघाची एक कमकुवत बाजू दिसतेय ती म्हणजे स्पिनर गोलंदाज.. संघात कोणत्याही स्टार स्पिनरचा समावेश नाहीये. आणि फिरकीला अनुकूल असणाऱ्या पिचवर संघाला त्या खेळाडूंची उणीव नक्की भासेल..
असे असू शकतात दोन्ही संघ (KKR vs RCB Probable playing 11)
KKR: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, अजिंक्य रहाणे (क), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिक नॉर्टजे
RCB: फिल सॉल्ट (विकेटकीपर), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (क), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी
One Comment