PAK vs NZ 3rd T-20 Live Streaming: पाकिस्तान- न्यूझीलंडमधील तिसऱ्या सामन्याची बदलली वेळ, भारतात आता या वेळेला सुरु होणार सामना..

PAK vs NZ 3rd T-20 Live Streaming: बाबर आणि रिझवानशिवाय न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था सध्या खूप वाईट आहे. पाकिस्तान संघ टी-२० मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. संघाने पहिले दोन सामने गमावले आहेत. पाकिस्तान संघ ५ सामन्यांच्या मालिकेत ०-२ असा पिछाडीवर आहे.
आता दोन्ही संघांमधील तिसरा टी-२० सामना २१ मार्च रोजी ऑकलंडमध्ये खेळला जाईल. मालिकेच्या बाबतीत, हा सामना पाकिस्तानसाठी ‘करा किंवा मरा’सारखा आहे. जर पाकिस्तान संघ हा सामना गमावला तर ते मालिकाही गमाववतील. पण त्याआधी आता सामन्याच्या वेळेमध्ये मोठे बदल केले गेले आहेत.
PAK vs NZ 3rd T-20 Live Streaming: तिसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत मोठा बदल.
पाकिस्तान संघात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसारखे स्टार खेळाडू टी-२० मालिकेत नाहीत. पहिले दोन टी-२० सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ६:४५ वाजता खेळले गेले. पण उर्वरित तीन टी-२० सामने पाच तास उशिरा खेळवले जातील.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ )यांच्यातील मालिकेतील तिसरा टी-२० सामना (PAK vs NZ) भारतीय वेळेनुसार सकाळी ११:४५ वाजता ऑकलंडच्या ईडन पार्क येथे खेळला जाईल. त्याचप्रमाणे, चौथा आणि पाचवा टी-२० सामना देखील एकाच वेळी खेळला जाईल. भारतात, ही मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केली जात आहे, तर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी, तुमच्या मोबाईल फोनवर सोनी लिव्ह अॅपचे सबस्क्रिप्शन असणे अनिवार्य आहे.
मालिकेतील चौथा टी-२० सामना २३ मार्च रोजी माउंट मनुगाई येथे खेळला जाईल. तर पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना २६ मार्च रोजी वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला.
पावसामुळे हा सामना १५-१५ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ९ विकेटच्या मोबदल्यात १३५ धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने सर्वाधिक ४६ धावा केल्या. न्यूझीलंडने १३.१ षटकांत ५ गडी गमावून १३७ धावा करून सामना जिंकला.
पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघ ९१ धावांवर ऑलआउट झाला. हा त्याचा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवा सर्वात कमी स्कोअर होता. त्याने त्याचा ८ वर्षांचा लज्जास्पद विक्रमही मोडला. पीसीबीने न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. पण हे खेळाडू आतापर्यंत न्यूझीलंडच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरले आहेत. तो वेगवान आणि स्विंग होणाऱ्या चेंडूंविरुद्ध अपयशी ठरत आहे.
हेही वाचा: