Shardul Thakur: लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर आता शार्दुल ठाकूरची आयपीएलमध्ये मागच्या दराने इंट्री, या संघाकडून खेळणार आयपीएल 2025

Shardul Thakur: आयपीएल 2025सुरु होण्यास केवळ एक दिवसाचा कालावधी उरला आहे. उद्यापासून जगातील सर्वांत मोठ्या टी-20 स्पर्धेचा रोमांच रंगणार आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे.
Shardul Thakur LSG च्या ताफ्यात दाखल,मोहसीन खानच्या जागी खेळणार .
आयपीएल 2025 मेगा लिलावात (IPL 2025 Mega Auction) विक्री न झालेल्या अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आता लखनौ सुपर जायंट्स (LSG) मध्ये सामील झाला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, ठाकूर हंगामाच्या तयारीपासून संघाशी संबंधित आहे आणि आता तो ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघात जखमी मोहसीन खानची जागा घेईल.
मोहसिन खानला एसीएल दुखापत झाली आहे ज्यामुळे तो गेल्या तीन महिन्यांपासून कोणत्याही क्रिकेट सामन्यात भाग घेऊ शकला नाही. जेव्हा त्याने लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) च्या नेटवर गोलंदाजी करायला सुरुवात केली तेव्हा त्याला पायाच्या स्नायूंना दुखापत झाली, ज्यामुळे त्याचे पुनरागमन अधिक कठीण झाले. म्हणूनच आता lsg ने त्याच्या जागी शार्दुलला संघाचा हिस्सा बनवले आहे.
याशिवाय लिलावात विकले न गेलेले भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये आकाश दीप, आवेश खान आणि मयंक यादव यांचा समावेश आहे, परंतु हे तिघे अद्याप कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीशी संबंधित नाहीत. आकाश दीप आणि मयंक सध्या सीओई (सेंटर ऑफ एक्सलन्स) येथे आहेत, तर आवेश खान गुडघ्याच्या दुखापतीतून बरा होत आहे आणि अद्याप संघात सामील झालेला नाही. वेगवान गोलंदाज मयंक यादवने नेटमध्ये हलक्या वेगाने गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे, परंतु तो अजूनही मॅच फिटनेसपासून खूप दूर आहे.
लखनौ सुपर जायंट्स (LSG) चे मार्गदर्शक झहीर खान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
“आमच्या काही खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे परिस्थिती खूप वाईट आहे. पण आता परिस्थितीला तोंड देण्यासाठी सकारात्मक गोष्टी शोधण्याची आणि काही उपाय अवलंबण्याची वेळ आली आहे. काही खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहेत, तर काही त्यांच्या फिजिओसोबत वेळ घालवत आहेत. सध्या यावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही, परंतु या हंगामात परिस्थिती खूप आव्हानात्मक असणार आहे.”
मुख्य वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत, शार्दुल ठाकूर आता संघाचे नेतृत्व करेल कारण तो संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. एलएसजी संघात शामर जोसेफ हा एकमेव परदेशी वेगवान गोलंदाज आहे, तर राजवर्धन हंगरगेकर आणि प्रिन्स यादव सारखे तरुण खेळाडू देखील संघाचा भाग आहेत. फिरकी विभागात स्थिरता आहे, परंतु वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत संघासमोर अजूनही मोठे आव्हान आहे.
हेही वाचा:
होळी पार्टीमध्ये तमन्ना विजय एकत्र? ब्रेकओप नंतर पुन्हा एकत्र दिसल्याने अफवांना वाव..