भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; या फलंदाजाच्या हाती दिली संघाची धुरा

आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. या मोठ्या इव्हेंट नंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्याची T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. 23 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांचा टी20 संघ जाहीर केला आहे. पुढील वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीसाठी BCCI ने ही मालिका आयोजित केली आहे.

ऑस्ट्रेलियाने संघाच्या नेतृत्वाची धुरा ही यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याच्याकडे देण्यात आली आहे. या मालिकेत व्हीएसटी रक्षक फलंदाज मॅथ्यूवेड यष्टीरक्षणाच्या जबाबदारी सोबत संघाचे नेतृत्व देखील सांभाळेल. संघात स्टीव्ह स्मित आणि डेबिट बॉर्नर यांचे पुनरागमन झाले आहे तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू एश्टन एगर याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली असल्याने त्याला वर्ल्डकप च्या संघात स्थान मिळवता आले नाही. मात्र या मालिकेत देखील त्याचे पुनरागमन झाले नाही.

5 T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम मध्ये होईल. दुसरा सामना हा त्रिवेंद्रम येथे 26 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. तिसरा सामना हा 28 नोव्हेंबर रोजी गुवाहटी येथे खेळला जाईल. चौथा सामना 1 डिसेंबरला नागपूर तर शेवटचा सामना 3 डिसेंबर रोजी हैदराबाद मध्ये होईल.

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मॅट शॉर्ट, नॅथन एलिस, टीम डेविड हे भारतात परततील. पॅट कमिन्स हा पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मायदेशी परतेल. मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, मार्श, कॅमरन ग्रीन हे देखील मायदेशी परततील.

निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली संघ निवडी बाबत बोलताना म्हणाले की, “अनुभवी आणि युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मॅथ्यू वेड हा यापूर्वी देखील संघाच्या नेतृत्वाची सांभाळला आहे. या स्पर्धेत देखील त्याची चांगली कामगिरी होईल. भारताला भारतात हरवणे एक मोठे कठीण काम आहे. तसेच विश्वचषक संघातील आठ खेळाडू T20 सामन्यांमध्ये खेळतील. त्यांना आयपीएलमध्ये आणि भारतात खेळण्याचा बराच अनुभव आहे.”

T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ:

मॅथ्यू वेड (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा, तन्वीर संघा.